मंगळवार, 28 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 13 मार्च 2021 (22:30 IST)

विखे-पाटील यांनी मेळावा घेवून गर्दी जमवली, त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करा चे आदेश

कोरोना संसर्ग कमी करण्यासाठी सरकारने लग्न, मेळावे घेण्यावर बंदी घातली असताना, भाजप आमदार राधाकृष्ण विखे-पाटील यांनी श्रीरामपूर येथे मेळावा घेवून कार्यकर्त्यांची गर्दी जमवली होती. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करा, असे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी श्रीरामपूर पोलिसांना दिले आहेत. 
 
जिल्हा अधीक्षक पाटील श्रीरामपूर येथे आले असताना पत्रकारांनी ही घटना निदर्शनास आणून दिली.  १२ मार्च रोजी आमदार विखे-पाटील श्रीरामपूर पंचायत समितीच्या आढावा बैठकीसाठी आले होते. या बैठकीनंतर श्रीरामपूर-बेलापूर रस्त्यावरील अनमोल रसंती सभागृहात कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यासाठी श्रीरामपूर तालुक्यातील कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. मेळाव्यानंतर सर्वाना स्नेहभोजन देण्यात आले. आमदार विखे-पाटील यांच्यासह माजी सभापती, नानासाहेब पवार, दीपक पटारे, प्रकाश चित्ते, जिल्हा परिषद सदस्य शरद नवले, नानासाहेब शिंदे, केतन खोरे, बबन मुठे, गिरीधर आसणे, भाऊसाहेब बांद्रे, तसेच बाजार समिती, पंचायत समिती पदाधिकाऱ्यांसह मोठा जनसमुदाय उपस्थित होता. या मेळाव्यासाठी कोणतीही परवानगी घेण्यात आलेली नव्हती.