Widgets Magazine

तुळजाभवानी मंदिरात व्हीआयपी दर्शन बंद

tulja bhawani
तुळजापूर- महाराष्ट्रची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या दर्शनासाठी सुटीच्या काळात मोठी गर्दी होते. अनेकजण आमदार, खासदारांना शिफारशी घेऊन येऊन व्हीआयपी दर्शनाचा लाभ घेतात. असे करण्याच्या सूचना संस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे यांनी दिल्या आहेत.
रविवार, मंगळवार, शुक्रवार तसेच सुटीच्या दिवशी भाविकांची संख्या चार लाखांवर जाते. गर्दीचा फायदा घेऊन व्हीआयपीच्या नावाखाली थेट दर्शनाचा व्यवसाय फोफावला आहे. जिल्हाधिकार्‍यांनी व्हीआयपीसाठी खासदार-आमदारांच्या शिफारशींचे पत्र घेण्याचे आदेश काढले होते. मात्र, या लेटरपॅडचाही गैरवापर सुरू झाल्याने रविवारी मंदिर कार्यालयात गोंधळ झाला.

जिल्हाधिकार्‍यांनी शिफारस पत्रांची पाहणी करून अशा शिफारशी बंद करण्याच्या सूचना केल्या. स्वत: आमदार किंवा खासदार असतील तरच त्यांना व्हीआयपी दर्शन देण्याची सूचना केली.


यावर अधिक वाचा :