गुरूवार, 21 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : शुक्रवार, 19 जुलै 2024 (11:28 IST)

विशालगड प्रकरणाची सुनावणी मुंबई उच्च न्यायालय करणार

Vishalgarh case will be heard by Bombay High Court
कोल्हापुरातील ऐतिहासिक विशाळगड किल्ल्यावरील वास्तू पाडल्या प्रकरणी दाखल केलेल्या तीन याचिकांवर तातडीने सुनावणी घेण्याचे मुंबई उच्च न्यायालयाने मान्य केले आहे. याचिकाकर्त्यातर्फे अधिवक्ता सतीश तळेकरांनी गुरुवारी या भागात झालेल्या हिंसाचार चा दाखल देत पावसाळ्यात इमारत पाडण्याची मोहीम राबवू नये अशी मागणी केली. आता न्यायालयाने आज शुक्रवार पासून याचिकांवर सुनावणी ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. 

या याचिकेत विशाळगड किल्यातील हजरत पीर मलिक रेहान दर्ग्यासह घरे, दुकाने, व इतर बांधकाम पाडण्याची कारवाई थांबवण्याची मागणी केली आहे. 

याचिकेत दावा केला आहे. की, 14 जुलै 2024 रोजी काही हल्लेखोऱ्यानी रहिवांशावर लोखंडी रॉड आणि काठ्यांनी हल्ला केला. दगडफेक देखील करण्यात आली. 

विशाळगड किल्ल्यावरील अतिक्रमण हटवण्याबाबत प्रलंबित  न्यायालयीन खटल्याबाबत मुंबई उच्च न्यायालयाचे सरकारी ऍटर्नी जनरलची मते मागविण्यात आली.15 जुलै रोजी प्राप्त झालेल्या अभिप्रायामध्ये असे नमूद केले की ज्या याचिकाकर्त्यांना उच्च न्यायालय आणि इतर न्यायालयात स्थगितीचे आदेश आहे. त्यांच्याशिवाय इतर अतिक्रमणे काढता येऊ शकते.हा अभिप्राय मिळाल्यावर प्रशासनाकडून अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्यात आली.  

Edited by - Priya Dixit