रविवार, 5 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : शनिवार, 6 मे 2023 (16:52 IST)

Vishwas Nangre Patil: विश्वास नांगरे पाटील यांचे फेक अकाऊंट बनवले

Vishwas Nangare Patil
Vishwas Nangre Patil:  सध्या सायबर गुन्हेगार नवनवीन मार्ग अवलंबवून  फसवेगिरी करतात. आता सायबर गुन्हेगारांनी आयपीएस अधिकारी व लाचलुपत प्रतिबंधक विभागाचे अप्पर पोलिस महासंचालक विश्वास नांगरे पाटील यांचे बनावट फेसबुक अकाउंट बनवल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. 
 
 
या घटनेची माहिती विश्वास नांगरे पाटील यांनी खुद्द फेसबुक पोस्टमधून या बाबत ही माहिती दिली. त्यांनी आपल्या पोस्टवर लिहिले आहे.'' नमस्कार मित्रांनो काही  गुन्हेगारांनी फेसबुकवर माझ्या नावावर बनावट खाते तयार करून माझ्या संपर्कातील लोकांना काही संदेश पाठवत आहे.त्यावर कोणताही प्रतिसाद देऊ नका किंवा काहीही माहिती सामायिक करू नका. यावर मी कायदेशीर कारवाई करत आहे.''       
 
ही फसवणूक आहे. सध्या सायबर गुन्हेगार फेक अकाउंट बनवून ऑनलाईन  फ्रॉड करण्याचे प्रमाण वाढले आहे.  सायबर गुन्हेगार फेसबुक, ट्वीटर, इंस्टाग्रामवर बनावट अकाउंट बनवून ऑनलाईन फसवणूक करत आहे. 
या प्रकरणी सायबर पोलिस अधिक तपास करत आहेत.

Edited by - Priya Dixit