1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 21 जानेवारी 2023 (15:36 IST)

काश्मीरसह पाकिस्तानही हवा आहे. हे फक्त तुम्हीच करू शकता- जैन धर्मगुरु श्रीमद विजय नित्यानंद सुरीषवर्जी म .सा.

raj thackeray
ठाणे येथील टेंभीनाका भागातील जैन मंदिरामध्ये शनिवारी सकाळी आयोजित कार्यक्रमात राज ठाकरे हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित आहेत. या कार्यक्रमादरम्यान मंदिरात राज ठाकरे यांनी जैन धर्मगुरु श्रीमद विजय नित्यानंद सुरीषवर्जी म .सा. यांच्याशी चर्चा केली. यावेळी तुमच्यामध्ये बाळासाहेबांची प्रतिमा दिसते, आम्हाला अखंड भारत पाहिजे, काश्मीरसह पाकिस्तानही हवा आहे. हे फक्त तुम्हीच करू शकता, बाळासाहेबांनी जशी भूमिका बजावली तशी भूमिका तुम्ही बजावा, बाळासाहेबांसारख्या तुमच्याकडून अपेक्षा आहेत, असे आवाहन  जैन धर्मगुरूंनी राज ठाकरे यांना केले.
 
दरम्यान, राज ठाकरे यांचा महिन्याभरातील ठाण्याचा दुसरा दौरा आहे. राज ठाकरे यांच्या दौऱ्याची तयारी ठाण्यातील मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे. जैन मंदिरातील कार्यक्रम पार पडल्यानंतर राज ठाकरे हे शहरात दोन ठिकाणी भेटी देणार असून त्यांच्या या भेटी खासगी असणार आहेत. यानंतर ते ठाण्याच्या शासकीय विश्रामगृहामध्ये शहरातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांच्याशी चर्चा करणार आहेत, अशी माहिती सुत्रांनी दिली.
 
Edited By- Ratnadeep Ranshoor