काय सांगता, चोरटयांनी परळीतून 124 गाढवं चोरी नेले, बीडच्या परळीतील विचित्र घटना
बीडजिल्ह्यातील परळी या शहरातून चोरटयांनी विविध भागातील तीन दिवसात वीटभट्टीवर काम करणाऱ्या मजुरांचे गाढव पळवून नेल्याचे विचित्र वृत्त मिळाले आहे. चोरटयांनी आता सोन चांदीच्या व्यतिरिक्त चक्क गाढवाला चोरून नेल्याची घटना घडली आहे. येथे चोरटयांनी परळी शहरातील विविध भागातून 18 लाख रुपयांपेक्षा जास्ती किमतीचे गाढव चोरून नेले. या तीन दिवसात तब्बल 124 गाढव चोरी गेल्याच्या या घटनेमुळे खळबळ माजली आहे. या घटनेची माहिती पोलिसांना मिळतातच प्रशासन जागं झाले आहे.
पोलीस आता दिवाळीच्या काळात चोरी गेलेल्या गाढवांचा शोधात लागली आहे. ऐन सणा सुदीच्या काळात गाढव चोरी गेल्याने मजुरांवर संकट आले आहे. सदर चोरीची तक्रार मजुरांनी पोलिसात केली आहे. शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षकांच्या म्हण्यानुसार, गाढव चोरी झाल्याची तक्रार नोंदवली आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहे. आता ऐन दिवाळीच्या वेळी पोलिसांना गाढव शोधण्याची वेळ आली आहे.