गुरूवार, 18 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 14 जानेवारी 2017 (11:02 IST)

महापौरांची हौस वाघाच्या बछडयांचा फोटो साठी छळ

औरंगाबाद येथील असलेल्या आणि पूर्ण राज्यात पांढरा वागासाठी प्रसिद्ध असलेल्या, महापालिकेच्या सिध्दार्थ उद्यानातील प्राणीसंग्रहालयातील समृध्दी या वाघिणीच्या तीन बछडयांचा गुरुवारी वीर, शक्ती आणि भक्ती असे नामकरण करण्यात आले होते. महापालिकेचे  महापौर भगवान घडामोडे आणि सभापती मोहन मेघावाले यांनी दोन महिन्यांच्या बछड्याबरोबर फोटोसेशन करून हौस भागविल्याने वन्यजीव संरक्षण कायद्याचे उल्लंघन झाले आहे. या पदाधिकार्‍यांना हे फोटोसेशन महागात पडण्याची शक्यता आहे.त्यांनी या छोट्या पिल्लांना अक्षरश त्यांच्या मर्जी विरुद्ध आणि कायद्या विरुद्ध हातात घेतले आहे. तर त्यांना खूप वेळ पाळायला सुद्धा लावले आहे.
 
मागच्या वर्षात वाघांचे बछडे महिन्याच्या आतच दगावल्यामुळे यावेळी प्राणीसंग्रहालयाने आई समृध्दीच्या अवतीभोवती छोट्याशा पिंज-यात त्या बछड्यांना ठेवले होते. नाव ठेवण्याच्या निमित्ताने त्यांना गुरूवारी पिंजर्‍याबाहेर काढण्यात आले. महापौर घडामोडे, सभापती मेघावाले यांच्यासह महापालिका पदाधिकार्‍यांनी त्यांचे नामकरण केले. यातील एका बछड्याच्या डोक्यावर हात ठेऊन त्याला कुरवाळण्याचा मोह महापौर आणि सभापतींना काही आवरला नाही. यावेळी घेतलेला व्हिडियो व्हायरल झाला असून या बछडयांचा कसा हाल केले गेले हे समोर आले आहे.