1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 10 जुलै 2022 (12:17 IST)

शिवसेनेवर कुणाचा हक्क ? आमदारांना नोटीस बजावली, 7 दिवसांत उत्तर देण्याचे आदेश

eknath uddhav
शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून पदभार स्वीकारला. शिंदे सरकार बहुमत देत असता ठाकरे आणि शिंदे यांच्या प्रतोद कडून एकमेकांना व्हीप बजावला असता हा व्हिप दोन्ही बाजूंकडून पाळला गेला नाही. त्याच अनुषंगाने शिवसेनेनं शिंदे गटाच्या 16 बंडखोर आमदारांना निलंबित करण्यासाठी नोटिसाही पाठवल्या होत्या. त्यानंतर शिवसेनेकडून त्यांना अपात्रतेसाठी विधानसभा अध्यक्षांना पत्रही देण्यात आलं होतं.  गटाच्या आमदारांना अपात्र ठरवण्याच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. या सुनावणी मध्ये आम्हीच जिंकणार असा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे. तसेच आम्ही जिंकणार असे शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांचे म्हणणे आहे. या दोन्ही गटाच्या आमदारांना विधिमंडळाचे सचिव राजेंद्र भागवत यांनी नोटीस बजावली असून दोन्ही गटांच्या आमदारांना येत्या 7 दिवसांत त्याचे उत्तर देण्याचे आदेश दिले आहे. आमचा न्यायव्यवस्थेवर विश्वास असून आम्ही कुठेही चुकलो नाही, आम्हीच शिवसेनेचे आहोत आणि शिवसेना आमचीच असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत विश्वास दाखवला आहे. 
 
 दोन्ही बाजूंकडून व्हिप बजावण्यात आल्यानंतर शिवसेना कोणाची हा प्रश्न उपस्थित होत आहे. त्याच पार्श्वभूमीवर विधिमंडळ सचिवांनी दोन्ही गटांना नोटिसा पाठवल्या असून, आमदारांना 17 जुलैपर्यंत उत्तर देण्यास सांगितले आहे.