मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 12 डिसेंबर 2019 (10:39 IST)

आरेतील वृक्षतोडीची चौकशी करणार

मेट्रो कारशेडसाठी आरे वसाहतीऐवजी अन्यत्र जागा शोधण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारने घेतला आहे. त्यासाठी वित्त विभागाच्या अप्पर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळामध्ये मेट्रो कारशेडसाठी 2100 झाडे तोडण्यात आली, त्याचीही चौकशी ही समिती करणार आहे.
 
मेट्रो कारशेडसाठी सध्या निश्चित केलेल्या जागेची पर्यावरण माहिती घेण्यासाठी एक नवा अहवाल मागवण्याचे सरकारने ठरवले आहे. त्यासाठी ही समिती स्थापन केली आहे. नगरविकास विभागाने जारी केलेल्या आदेशात या समितीची कार्यकक्षा निश्चित करण्यात आली आहे.