गुरूवार, 2 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : सोमवार, 19 फेब्रुवारी 2024 (12:03 IST)

भाजप मनसे युती होणार ?

raj thackeray devendra
सध्या भाजप- मनसेची युती होणार अशी चर्चा होत आहे. मनसेचे तीन नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नुकतीच गुप्त बैठक झाली. या बैठकीत मनसेचे नेते संदीप देशपांडे, बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई हे उपस्थित होते. या बैठकीनंतर भाजप-मनसे युती होण्याचा चर्चा रंगू लागल्या आहे. 
 
मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी या वर प्रतिक्रिया देताना म्हणाले, आमची अशी विशेष काही चर्चा झाली नाही. ही फक्त सदिच्छा भेट होती.आपण एखाद्याला भेटल्यावर त्याचा काहीतरी अर्थ काढायलाच हवा से काहीच नाही.  
आम्हाला देवेंद्र फडवणीस यांना भेटायचं होत म्हणून आम्ही तिघे त्यांना भेटलो. तसेच फडणवीस हे राज ठाकरे यांना येऊन भेटतात. याचा अर्थ काहीतरी लावण्याची गरज नाही. 

राज्यात सध्या अनेक घडामोडी सुरु आहे. यात मनसेचे काही नेते भाजपचे देवेंद्र फडणवीस यांना भेटले यावर चर्च सुरु झाल्या. मनसे आणि भाजपची युती होण्याचा चर्चा सुरु झाल्या आहे. 
 
 Edited by - Priya Dixit