मंगळवार, 5 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 24 ऑक्टोबर 2018 (10:55 IST)

यशवंत देव यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू

yashwant dev
ज्येष्ठ संगीतकार, गायक आणि कवी यशवंत देव यांच्यावर मुंबईमधील दादरच्या शुश्रुषा रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. 92 वर्षीय देव यांना 10 ऑक्टोबर रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेव्हापासून त्यांच्या प्रकृतीत चढउतार दिसून येत आहेत. शुश्रुषा रुग्णालयाने दिलेल्या माहितीनुसार तपासणीदरम्यान त्यांना चिकनगुनिया झाल्याचे निदान झाले. मात्र उपचारांना त्यांची प्रकृती अपेक्षेप्रमाणे साथ देत नसल्याने त्यांना अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले आहे.