गुरूवार, 18 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

पोलिसाना शिव्या देणाऱ्या त्या व्हायरल व्हिडियोतील झोमॅटो गर्लला अटक केली, वाचा काय आहे प्रकरण

सोशल मीडियावर झोमॅटोमध्ये काम करणाऱ्या एका महिला कर्मचाऱ्याचा व्हिडिओ जबदस्त  व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ नवी मुंबईतला असून तो पोलिसांनी शूट केला आहे. या व्हिडिओमध्ये झोमॅटोमध्ये काम करणारी ही मुलगी वाहतूक पोलिसांना अत्यंत घाण व अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत आहेत. हा संपूर्ण  व्हिडिओ मुंबई पोलिसांपर्यंत पोहचला आणि त्यानंतर या मुलीला अटक केली आहे. या मुलीचे नाव प्रियंका मोगरे असे या फूड डिलिव्हरी गर्लच आहे. प्रियंका वरळी येथे वास्तव्यास आहे.
 
नवी मुंबईतील वाशी या ठिकाणी 8 ऑगस्ट रोजी ती  सेक्टर नऊमध्ये गेली होती, या मुलीने तिचे वाहन शिस्त मोडून उभे केले होते. ज्यानंतर ट्राफिक चे मोहन सलगर यांनी कारवाई करण्याच्या हेतूने या वाहनाचा फोटो काढला. या फोटोत वाहनाच्या बाजूला प्रियंकाही उभी होती. त्यामुळे तुम्ही माझाच फोटो का काढलात? असे तावातावाने विचारत प्रियंकाने पोलिसांना, महिला पोलिसांनाही अर्वाच्य भाषेत जबर शिवीगाळ करत तमाशा केला होता. वाहन अडवता आले नाही तर फोटो काढल्यास त्या वाहनाच्या क्रमांकावरुन संबंधित शिस्त मोडणाऱ्या व्यक्तीचे सगळे तपशील मिळतात व त्याच्या घरी दंडाची पावती पाठवली जाते. याच पद्धतीचा अवलंब सलगर यांनी केला, मात्र त्या फोटोबाबत पूर्ण माहिती न घेता आणि काहीही ऐकून न घेता प्रियंकाने सलगर आणि इतर कर्मचाऱ्यांना शिव्या देण्यास सुरुवात केली. मात्र पोलिसांनी अखेर या मुलीला अटक केली आहे. प्रियंका मोगरेला वाशी येथील सेक्टर 17 या ठिकाणाहून अटक करण्यात आली आहे.सरकारी अधिकाऱ्यांवर हल्ला, लुटीच्या दृष्टीने अंगावर धावून जाणे, पोलीस हुकूम न मानणे, सरकारी कामात व्यत्यय आणणे या गुन्ह्यांची कलमं या मुलीवर लावण्यात आली आहेत.