testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

सचिनचा 'वन-डे'ला गुडबाय!

sachin
वेबदुनिया|
WD
बीसीसीआयने 'ट्विटर'वरून सचिनच्या निवृत्तीचे वृत्त प्रसिद्ध केले. आपण एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करीत असल्याची माहिती सचिनने बीसीसीआयला दिली आहे. हे बघून त्याचे लाखो चाहते व अवघ्या क्रिकेटविश्वाला आश्चर्याचा धक्का बसला, मात्र हा निर्णय धक्कादायक नसल्याचे बीसीसीआयने म्हटले आहे. सचिनच्या निर्णयाचा आम्ही आदर करतो, असेही बीसीसीआयने स्पष्ट केले.

बीसीसीआयचे अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांना उद्देशून ‍सचिनने बीसीसीआयला दिलेल्या निवेदनात स्पष्ट केले, की विश्वविजेत्या भारतीय संघाचा सदस्य असल्याने, माजे स्वप्न पूर्ण झाले. 2015 साली विश्वचषकाचा किताब भारताकडे कायम राहण्यासाठी त्याची तयारी आतापासून करणे गरजेचे आहे. भारतीय क्रिकेय संघाच्या भविष्यातील कामगिरीसाठी मी संघाला शुभेच्‍छा देते. गेल्या अनेक वर्षांपासून माझ्यासोबत असलेल्या माझ्या चाहत्यांचे आणि प्रेक्षकांचे मी आभार मानतो, अशा शब्दांत वयाच्या सोळाव्या वर्षापासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सचिनने कृतज्ञता व्यक्त केली.
गेल्या काही महिन्यांपासून फॉर्ममध्ये नव्हता. सातत्यान अपयशी ठरत असल्याने त्याच्यावर मोठा प्रमाणात टीका सुरू झाली होती. उठसूठ कोणीही सचिनवर टीकर करणे सुरू केले होते व सोबतच निवृत्ती घेण्याचे अनाहुत सल्लेही त्याला देण्यात येत होते. प्रसारमाध्यमांनीही सचिनच्या निवृत्तीबाबत चर्चा घेऊन हा विषट लावून धरला होता. यामुळे कदाचित क्रिकेटच्या या विक्रमादित्यावर दबाव वाढला होता, मात्र बीसीसीआय किंवा अन्य कोणत्याही ज्येष्ठ क्रिकेटपटूने सचिनने निवृत्ती घ्यावी अशी इच्छा व्यक्त केलेली नव्हती.
उलट निवृत्तीबाबत निर्णय घेण्याचा अधिकार सचिनचा स्वत:चा असून, कोणी त्याला याबाबत सल्ला देण्याची गरज नसल्याचेच क्रिकेटविश्वाने सचिनला कायम सांगितले आहे. त्यामुळे एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा सनिचा निर्णय अवघ्या क्रिकेटविश्वाला आश्चर्याचा धक्का देणारे आहे. तथापि काही आजी माजी क्रिकेटपटुंनी सचिनच्या निवृत्तीवर आश्चर्य व्यक्त केले आहे तर काहींनी हा निर्णय योग्य असल्याचाही निर्वाळाही दिला.
'टाइम'नेही केला सचिनचा गौरव!
प्रत्येकाला वेळेचा सामना करावाच लागतो, मात्र सचिनसमोर जाणे वेळही थिजला. आपल्याकडे चॅम्पियन होते. आपल्याकडे लिजंडडी आहेत, मात्र आपल्याकडे दुसरा सचिन कधीच नव्हता ना! दुसरा सचिन कधी होईल, अशा शब्दात जगप्रसिद्ध 'टाइम' नियतकालिकाने सचिनचा गौरव केला आहे.


यावर अधिक वाचा :

PUBG गेम आपल्याला पोहोचवू शकतो हॉस्पिटलमध्ये

national news
व्हिडिओ गेम PUBG बद्दल आपल्याला माहिती असेलच परंतु आपल्याला कदाचित याच्या वाईट ...

प्रजास्ताक दिनाचा इतिहास

national news
भारताला ब्रिटीश राजवटीपासून १५ ऑगस्ट १९४७ ला स्वातंत्र्य मिळाले. यामागे भारताचा ...

सर्वोच्च न्यायालयाकडून शिवस्मारकाचे काम थांबविण्याचे आदेश

national news
शिवस्मारकाचे काम थांबविण्याचे तोंडी आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर सार्वजनिक ...

डाउनलोड स्पीडमध्ये रिलायंस जिओ अव्वल

national news
गेल्या वर्षभरात 4जी डाउनलोड स्पीडच्या बाबतीत जिओने अव्वल क्रमांक गाठलाय. 2018 मध्ये जिओ ...

मायक्रोसॉफ्ट Windows 7 चा सपोर्ट बंद करणार

national news
प्रसिद्ध कंपनी मायक्रोसॉफ्टने Windows 7 चा सपोर्ट बंद करण्याची तयारी केली आहे. विंडोज ७ ...

भारताची ऐतिहासिक कामगिरी : ऑस्ट्रेलियाला चारली धूळ; ...

national news
भारताने मेलबर्न एक दिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाला पराभवाची धूळ चारत ऐतिहासिक मालिका ...

तो' एपिसोड ‘हॉटस्टार’वरून काढून टाकला

national news
‘कॉफी विथ करण’ या प्रसिद्ध चॅट शोचा क्रिकेटर हार्दिक पांड्या आणि के एल राहुलचा नुकताच ...

बर्‍याच महिलांशी संबंध असलेल्या वक्तव्यावर अडकले पंड्या, ...

national news
भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड (बीसीसीआय) ने बुधवारी ऑलराउंडर हार्दिक पंड्या आणि ओपनर के. ...

टीम इंडियाला बोनस जाहीर

national news
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ४ टेस्ट मॅचच्या सीरिजमध्ये भारताचा २-१नं विजय मिळवत ७१ वर्षांमध्ये ...

सिडनी टेस्ट ड्रॉ : टीम इंडियाने 70 वर्षांनंतर रचला नवीन ...

national news
आशियाई देशांनी कांगारूंच्या देशात एकूण 98 सामने खेळले आणि त्यापैकी केवळ 11 मध्ये विजय ...