1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. शिवजयंती
Written By
Last Modified: शुक्रवार, 14 फेब्रुवारी 2020 (16:48 IST)

शिवाजी महाराज जोखीम पत्करून गरिबांना मदत करायचे

Shivaji maharah
त्या काळी शिवाजी वेष बदलून राज्यात फिरस्ती घेत असत. मोगल सैन्य त्यांचा पाठलाग करत असत. एके दिवशी शिवाजीने एका गरीब ब्राह्मणांकडे विसावा घेतला. विनायक देव असे त्या ब्राह्मणांचे नाव असत. तो आपल्या महाताऱ्या आईसोबत वास्तव्य करीत होता. तो उदर निर्वाहासाठी भीक मागायचा. जेम-तेम त्याला अन्न मिळायचे तरी त्यांनी शिवाजींना उत्तम वागणूक दिली. 
 
एके दिवशी त्याला भिक्षा मागून कमी अन्न -धान्य मिळाले. त्याने घरी येऊन जेवण बनवून आपल्या आईला आणि शिवाजींना दिले आणि स्वतः उपाशी राहिला. शिवाजींना हे सगळे बघून वाईट वाटले. त्यांनी त्या गरीबांची मदत करण्याचे निश्चित केले. त्यांनी मोघल सुभेदारांना पत्र लिहून स्वतःला कैद करण्यास आणि 2000 रुपये अशर्फी ब्राह्मणास देण्याचे सांगितले आणि आपला पत्ता जेथे ते थांबले होते कळविला. 
 
सुभेदारांनी लगेच शिवाजींना अटक केली. विनायकला नंतर कळाले की त्याच्याकडे राहिलेले पाहुणे अजून कोणी दुसरे नसून स्वतः शिवाजी महाराज होते. त्याला फार वाईट वाटले आणि तो स्वतःला मारू लागला आणि बेशुद्ध झाला. तानाजीने त्याचे सांत्वन करून त्याला शिवाजींना सुभेदारांकडून मुक्त केल्याचे सांगितले. शिवाजी महारांजानी स्वतःचा जीव धोक्यात देऊन विनायकची मदत केली.