शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. श्राद्धपक्ष
Written By

श्राद्ध पक्षात पितरांना कशा प्रकारे मिळतो आहार

* पुराणांमध्ये यमलोक हे मृत्युलोकावर दक्षिणेत 86,000 अंतरावर असल्याचे मानले गेले आहे. एक लाख योजनमध्ये पसरलेल्या यमपुरी किंवा पितृलोकाचे उल्लेख गरूड पुराण आणि कठोपनिषदात आढळतात.
* मृत्यूनंतर आत्मा पितृलोकात 1 ते 100 वर्षांपर्यंत मृत्यू आणि पुनर्जन्म अश्या मध्य स्थितीत असते, असे मानले गेले आहे. पितरांचा वास चंद्राच्या ऊर्ध्व भागात मानले गेला आहे.
 
कसे खाली येतात पितर?
* सूर्याच्या सहस्र किरणांमध्ये अमा नावाची किरण सर्वात प्रमुख आहे, अमाच्या तेजामुळे सूर्य त्रैलोक्याला प्रकाशमान करतात. त्या अमा मध्ये तिथी विशेषला वस्य अर्थात चंद्र भ्रमण होतं तेव्हा या किरणाच्या माध्यमाने चंद्राच्या उर्ध्वभागाने पितर पृथ्वीवर उतरतात.
* म्हणूनच श्राद्ध पक्षाच्या अमावस्या तिथीचे महत्त्व आहे. अमावस्येसह मन्वादि तिथी, संक्रांती काळ व्यतिपात, गजच्दाया, चंद्रग्रहण आणि सूर्यग्रहण या समस्त तिथी पितरांना श्राद्ध द्वारे तृप्त केलं जाऊ शकतं.
 
कश्या प्रकारे होते पितरांना भोजन प्राप्ती?
* ज्या प्रकारे पशूंचे भोजन तृण आणि मनुष्यांचे भोजन अन्न म्हणून आहे त्या प्रकारे देवता आणि पितरांचे भोजन अन्नाचे सार तत्त्व आहे. सार तत्त्व अर्थात गंध, रस आणि उष्मा.
* देवता आणि पितर गंध आणि रस तत्त्वाने तृप्त होतात. दोघांसाठी वेगवेगळ्या प्रकाराचे गंध आणि रस तत्त्वांचे निर्माण केलं जातं. विशेष वैदिक मंत्रांद्वारे विशेष प्रकाराची गंध आणि रस तत्त्वच पितरांपर्यंत पोहचतात.
* एका जळत असलेल्या कंड्यावर गूळ आणि तूप टाकून गंध निर्मित केली जाते. त्यावरच विशेष अन्न अर्पित केलं जातं. तीळ, अक्षता, कुश आणि जल यासह तर्पण आणि पिंडदान केलं जातं. बोटांनी देवता आणि अंगठ्याने पितरांना जल अर्पण केलं जातं.
* पितर आणि देवतांची योनी या प्रकारे असते की ते लांबपर्यंतच्या गोष्टी ऐकून घेतात. लांबून पूजा-अन्न ग्रहण करून घेतात आणि लांबूनच स्तुतीने संतुष्टदेखील होतात. या प्रकारे ते भूत, वर्तमान आणि भविष्याबद्दल सर्वकाही जाणून घेतात व सर्वत्र पोहचू शकतात.
* मृत्युलोकात केलेले श्राद्ध त्याच मानव पितरांना तृप्त करतं जे पितृलोकाच्या प्रवासावर आहेत. ते तृप्त होऊन श्राद्धकर्त्यांच्या पूर्वजांना जिथे कुठे ज्या स्थितीत असतील, जाऊन तृप्त करतात.
* म्हणून श्राद्ध पक्षात पितरांचे पिंडदान आणि तर्पण केल्यावर सहकुटुंब भोजन करावे. श्राद्ध ग्रहण करणारे नित्य पितर श्राद्ध कर्त्यांना श्रेष्ठ वरदान देतात.