Widgets Magazine

कार्तिक चतुर्दशीला करावे सुपिंडी श्राद्ध

Kartikeya
वेबदुनिया|
कार्तिक शुक्ल चतुर्दशीच्या दिवशी सुपिंडी श्राद्घ करण्याचे महत्त्व आहे. या दिवशी पितरांच्या निमित्याने सिद्घवट व रामघाटावर दान करण्यात येते. खास करून पितरांच्या आत्मेला शांती व घरात सुख सौभाग्यासाठी दान व पिंडदान केले जाते.
याच प्रकारे कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी तीर्थाजवळ तुपाचा दिवा लावून ब्राह्मणाला दान करण्याची पद्धत आहे. नंतर तिळाच्या तेलाचे दिवे नदीत सोडण्याचे विधान धर्मशास्त्रात सांगण्यात आले आहे. असे केल्याने पितरांना आदित्य विष्णुलोकाची प्राप्ती होते.
> पौराणिक मान्यतेनुसार कार्तिक मास बारा महिन्यांमध्ये सर्वश्रेष्ठ मानण्यात आला आहे. हा महिना कार्तिकेय द्वारा केलेल्या साधनेचा महिना आहे. यामुळे या महिन्याचे नाव कार्तिक पडले आहे. या दिवशी कार्तिकेयच्या पूजनाचे विशिष्ट महत्त्व आहे. > कार्तिकेयाने धर्मशास्त्रात विष्णूचे रूप व अर्द्घांगिनी राधेचा विशेष उल्लेख केला आहे.

कार्तिक महिन्यात ज्या लोकांनी मासापर्यंत व्रताचे संकल्प केलेले नसतात, ते कार्तिक चतुर्दशी व पौर्णिमेच्या दिवशी तीर्थ स्थानावर जाऊन राधा-दामोदराची विशेष पूजा करू शकतात. कार्तिक महिन्यात राधा-दामोदरासोबत शालिग्राम व तुळशीपूजेचे विशेष महत्त्व आहे.


यावर अधिक वाचा :