1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. श्रावण
Written By

शितळा सप्तमीला काय करावे

shila saptami
श्रावण महिन्यात शुद्ध सप्तमीला शितळा सप्तमी किंवा शिळासप्तमी असे म्हणतात.
 
काय करतात या दिवशी
घरातील चूल, शेगडी, आधुनिक युगात गॅस स्टोव्ह व इतर स्वयंपाक शिजत असलेल्या साधनांची स्वच्छता करून त्यांची पूजा करतात.
 
या दिवशी शितळा देवीची पूजा करतात अर्थात चूल पेटवत नाही कारण शितळा माता चुलीजवळ वावरत असते, अशी समजूत आहे.
 
षष्टीच्या दिवशी खाद्य पदार्थ तयार करून ठेवले जातात.
 
सप्तमीला या पदार्थांचे नैवेद्य दाखवून प्रसाद ग्रहण केला जातो.
 
या दिवशी सा कुमारिकांना भोजन दिले जाते.
 
या दिवशी जलाशयांची पूजा करण्याचीही प्रथा आहे. या पूजेने मुलांना आजार होत नाही आणि त्यांच्यावरील संकट दूर होतात, अशी धारणा आहे.