शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. श्रावण
Written By

श्रावण रविवारी काय करावे

श्रावण महिन्याच्या रविवारी सूर्योपासना म्हणून व्रत केले जात असून आदित्य राणूबाईची कहाणी वाचली जाते. हे स्त्रियांनी करावयाचे व्रत आहे.
 
कसे करावे हे व्रत
श्रावणमासी आदित वारी मौन उठावे, स्नानानंतर विड्याच्या किंवा नागवेलीच्या पानावर रक्तचंदनाने सूर्याचे चित्र काढावे. बाजूला एका वर्तुळात षटकोन काढावा. नंतर सहापदरी दोऱ्याला सहा गाठी मारून सूर्य चित्र, षटकोन आणि सहा गाठी मारलेला सहापदरी दोरा ह्या सर्वांची पूजा करावी. पानांचा विडा, फुलांचा झेला, दशांगाचा धूप, गूळ-खोबरे-याचा नैवेद्य दाखवावा. नंतर आदित्यराणूबाईची कहाणी करावी. सामर्थ्याप्रमाणे एका सवाष्णीला जेवावयास घालावे. 
व्रत करणे शक्य नसल्यास स्नानादी नित्यकर्म करून सूर्य आणि राणूबाईंची मानसपूजा करून गायत्री मंत्र जप करावा.