Widgets Magazine
Widgets Magazine

नागपंचमीला बाहुलीला बदडण्याची परंपरा

वेबदुनिया 

nagpanchami
नागपंचमी हा सण देशाच्या विविध भागात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. मात्र उत्तर प्रदेशात विचित्र पद्धतीने नागपंचमी साजरी केली जाते. नागपंचमीला कपड्याची बाहुली तयार करून तिला जोरजोरात बदडले जाते.
 
नागपंचमीला उत्तरप्रदेशातील महिला घरी जुन्या कपड्यांपासून बाहुली तयार करतात. घराबाहेर टांगून लहान मुले त्या बाहुलीला काठीने बदडून आनंद व्यक्त करतात. ह्या परंपरेमागे एक कथा आहे. 
 
विषारी डसल्याने राजा परीक्षित यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर अनेक पिढ्या उलटून गेल्या. राजा परीक्षिताची चौथी पीढ़ीतील एका मुलीचा विवाह झाला. तिला राजाच्या मृत्यूविषयी माहीत होते. त्या मुलीच्या सासरी एका महिलेला तिने हे रहस्य सांगितले, परंतु कोणाला सांगू नकोस अशी अट घातली. परंतु दुसर्‍या महिलेला महिला ही गोष्ट सांगितली. असे करत ते रहस्य संपूर्ण राज्यात पसरले. तक्षक राजाने राज्यातील मुलींना चावडीवर बोलावून त्यांना चाबकाने बदडले. महिलांच्या पोटात कोणतीच गोष्ट लपून राहत नाही. ही गोष्ट तेव्हा उदयास आली. तेव्हापासून नागपंचमीला कपड्याची बाहुली तयार करून तिला बदडण्याची परंपरा आहे. 
 
या दिवशी उत्तरप्रदेशात घराच्या भिंतीवर नागाचे चित्र काढून त्याची पूजा केली जाते. घरात सुखशांती नांदावी म्हणून प्रार्थना केली जाते. या दिवशी नागाचे दर्शन शुभ मानले जाते. गारुडी नाग प्रत्येक घरी नेऊन दर्शन घडवतात. नागपंचमीला उत्तरप्रदेशात ठिकठिकाणी यात्रा भरते. कुस्ती स्पर्धेचे आयोजन केले जाते. Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

सण-उत्सव

news

का करतात नागपंचमी साजरी

श्रावण महिन्यातील पहिला आणि महत्त्वाचा सण म्हणजे नागपंचमी. यादिवशी स्त्रिया नवीन अलंकार, ...

news

कालसर्प योग आणि नागपंचमी पूजन!

जेव्हा जन्मपत्रिकेत राहू व केतूच्यामध्ये उरलेले सात ग्रह येतात, तेव्हा तो व्यक्ती ...

news

श्रावणी सोमवार : कसे करावे व्रत

श्रावण महिन्यात शंकराची प्रार्थना करणे अत्यंत शुभ मानले जाते. या महिन्यात विशेषतः सोमवारी ...

news

See Video : गटारी का साजरी करतात !

श्रावण महिन्याच्या अगोदर येणारी अमावस्या म्हणजे आषाढी अमावास्येला दिव्याची अमावस्या ...

Widgets Magazine