1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. श्रावण
Written By
Last Modified: सोमवार, 23 ऑगस्ट 2021 (17:40 IST)

श्रावणाच महात्म्य..!

Shravan
उनसावली चा खेळ आवडे,
रूप तुझं रे खूप भाबडे,
क्षणात येई राग तुला रे,
लगेचच शांत कसा होई रे?
फुलांचा धुंद सुवास ही येई,
सणा सुदी ची नांदी ही होई,
हुरहूर माहेर ची लागे जीवा,
मातीतून ही हुंकार तो यावा,
दूर रानी वाजे वेणू, हंबरती गायी,
लुसलुशीत गवत खावंया ती जाई,
वडा-पूरणाचा सुटे घमघमाट,
श्रावणात होई गोडधोडाचा घाट,
ओळींन येती सण वार ते सारे,
श्रावणाचे हे रुप ही भावणारे !
असा हा "श्रावण"कोणा कसा न भावेल?
सणावारांची ज्यात असते रेलचेल!
....अश्विनी थत्ते