गुरूवार, 28 मार्च 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. श्रावण
Written By

श्रावण पाळा, या वस्तू टाळा

1. दुधाचे सेवन करू नये.
श्रावणात दूध पिणे वर्ज्य मानले गेले आहे. शास्त्रानुसार या महिन्यात महादेवाला दूध अर्पित करणे उत्तम मानले गेले आहे. परंतू स्वत: दुधाचे सेवन आरोग्यादृष्या योग्य नाही.
 
2. वांगी मुळीच खाऊ नये.
या दरम्यान वांग्याची भाजी खाणे योग्य नाही. वांग्यांव्यतिरिक्त हिरव्या पाले भाज्या देखील सेवन करू नये.
 
3. वाईट विचार करू नये.
या दरम्यान कोणत्याही प्रकाराचे वाईट विचार मनात आणू नये. कोणाशी वाईट वागू नये. आपल्या वाणीवर नियंत्रण ठेवावं. मन शांत ठेवावं आणि अधिकाधिक वेळ साधना करावी.
 
4. कोणाची अपमान करू नये.
आपण वयस्कर, गरीब, गरु किंवा इतर कोणाचाही अपमान करणे टाळावे. असे केल्याने महादेव नाराज होतात. मनात सदैव प्रेमाची भावना असावी.
 
5. महादेवाला या वस्तू अर्पित करू नये.
महादेवाची पूजा करताना हळद, शेंदूर आणि तुळस चुकीने देखील अर्पित करू नये. या वस्तू महादेवाला वर्ज्य मानल्या गेल्या आहेत.
 
6. मास- मदिराचे सेवन करू नये.
या दरम्यान दारू आणि मांसाहाराचे सेवन करू नये. हा महिना अत्यंत पवित्र असतो. 
 
7. घराच्या स्वच्छ असावं.
या महिना पावसाळ्यात येत असल्याने स्वच्छतेकडे लक्ष देणे गरजेचे आहे. या दरम्यान कीटाणूंचे प्रमाण वाढतं म्हणून स्वच्छतेसह बाहेरचं खाणे देखील टाळावे.
 
8. झाडं कापू नये.
या दरम्यान वृक्ष कापू नये उलट कुटुंब आणि मित्रांसह अधिकाधिक वृक्ष लावावे. तसेच देवाला बेलपत्र आणि ताजी फुलं अर्पित करावी.
 
9. शुभ कार्य करू नये
चातुर्मासात कोणत्याही प्रकाराचे शुभ कार्य करणे योग्य नाही. तसेच श्रावणात देखील शुभ कार्य करणे टाळा आणि जास्तजास्त वेळ देवाची आराधना करण्यात घालावा.