1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. श्रावण
Written By

का करतात नागपंचमी साजरी

Nagpanchami celebration
श्रावण महिन्यातील पहिला आणि महत्त्वाचा सण म्हणजे नागपंचमी. यादिवशी स्त्रिया नवीन अलंकार, वस्त्रे नेसून नागदेवताची पूजा करतात. स्त्रिया पाटावर हळद-चंदनाने नाग-नागीण आणि त्यांच्या पिलांची चित्रे काढून त्याला दूध, लाह्या, आघाडा, दूर्वा वाहून पूजा करतात. या सणाला विशेषतः: गव्हाची खीर आणि चण्याची डाळ, गूळ यांपासून बनवलेल्या उकडीची पुरणाची दिंड तयार केली जाते. 
'भावाला चिरंतन आयुष्य आणि अनेक आयुधांची प्राप्ती होवो आणि तो प्रत्येक दु:ख आणि संकट यातून तारला जावो', हे हा दिवस साजरा करण्यामागील एक कारण आहे.
 
या विषयीची कथा जाणून घेण्यासाठी व्हिडिओ बघा...