गुरूवार, 28 मार्च 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. श्रावण
Written By

या 11 वस्तू अती प्रिय आहे महादेवाला

महादेव तत्काल प्रसन्न होणारे देव आहे. म्हणूनच त्यांना आशुतोष म्हटलं जातं. चला जाणून घ्या 11 अश्या वस्तू ज्या श्रावण मासात महादेवाला अर्पित केल्याने प्रत्येक इच्छा पूर्ण होते. या सामुग्री आहेत: जल, बिल्वपत्र, आकडा, धतुरा, भांग, कापूर, दूध, तांदूळ, चंदन, भस्म, रुद्राक्ष ..... 

जल : शिव पुराणाप्रमाणे महादेव स्वत: जल आहे आणि महादेवावर जल चढवण्याचे महत्त्वदेखील समुद्र मंथनापासून जुळलेले आहे. आगप्रमाणे विष प्यायल्यानंतर महादेवाचे कंठ निळे पडले होते. विषाची उष्णता शांत करण्यासाठी, शीतलता प्रदान करण्यासाठी सर्व देवी-देवतांनी त्यांना जल अर्पित केले. म्हणूनच शिव पूजेत जलचे विशेष महत्त्व आहे.

बिल्वपत्रे :  देवाच्या तीन नेत्रांचे प्रतीक आहे बिल्वपत्रे. म्हणूनच तीन पानांचे बिल्वपत्रे महादेवाला अत्यंत प्रिय आहे. महादेवाच्या पूजनात व अभिषेकमध्ये बिल्वपत्रे यांचे प्रथम स्थान आहे. ऋषिमुनीप्रमाणे महादेवाला बिल्वपत्रे अर्पित करणे आणि 1 कोटी कन्यांचे कन्यादान करण्याचा फल एकासमान आहे.

आकड्याचे फूल : शास्त्रांप्रमाणे शिव पूजेत एक आकड्याचे फूल चढवणे सोनं दान करण्याच्या समांतर आहे.


धोत्रा : महादेवाला धोत्रा अर्थात धतुरा अत्यंत प्रिय आहे. यामागील धार्मिक कारण हे आहे की महादेव कैलास पर्वतावर राहत होते. हे अत्यंत शीत क्षेत्र असल्यामुळे येथे उष्णता प्रदान करणार्‍या आहाराची गरज असते. वैज्ञानिक दृष्टीने धोत्रा सीमित मात्रेत घेतल्याने औषधीचं काम करतं आणि शरीराला आतून उष्ण ठेवतं.

भागवत पुराणाप्रमाणे एक धार्मिक कारण हेही आहे की जेव्हा महादेवाने सागर मंथनाहून निघालेले विष सेवन केले तेव्हा ते व्याकुल झाले. हे बघून अश्विनी कुमारांनी भांग, धतुरा, बेल इत्यादी औषधे देऊन त्यांचा उपचार केला. तेव्हापासूनच महादेवाला भांग धतुरा प्रिय आहे. शिवलिंगावर धतूरा अर्पित करत असताना आपल्या मन आणि विचारांचा कडूपणाही अर्पित करावा. 


भांग : महादेव नेहमीच ध्यानमग्न असतात. भांग ध्यान केंद्रित करण्यास मदत करते. म्हणून ते नेहमी परमानंदात असतात. विषावर औषध म्हणून त्यांनी भांगचे सेवन केले होते परंतू देवाने प्रत्येक कडूपणा आणि नकारात्मकतेला आत्मसात केले म्हणून भांग त्यांना प्रिय आहे. 
महादेव जगात व्याप्त वाईटपणा आणि नकारात्मक वस्तू स्वत:मध्ये ग्रहण करून घेतात आणि आपल्या भक्तांची विषापासून रक्षा करतात.

कापूर : महादेवाचा प्रिय मंत्र आहे- कर्पूरगौरं करूणावतारं.... अर्थात जो कापुरासारखा उज्ज्वल आहे. कापुराचा सुगंध वातावरणाला शुद्ध आणि पवित्र बनवतं. महादेवाला हे सुगंध‍ प्रिय आहे.

दूध: श्रावण मासात दुधाचे सेवन निषेध आहे. या महिन्यात आरोग्यासाठी दूध हानिकारक असतं. म्हणूनच या महिन्यात दुधाचे सेवन न करता ते महादेवाला अर्पित करण्याचा नियम आहे.

तांदूळ :  तांदळाला अक्षता असेही म्हणतात. अक्षता अर्थात न तुटलेला. अक्षता पूजेत अनिवार्य आहे. कोणत्याही पूजेत गुलाल, हळद, अबीर आणि कुंकू अर्पित केल्यानंतर अक्षता वाहल्या जातात. अक्षता नसल्यास शिव पूजा पूर्ण मानली जात नाही. एखाद्या वेळेस पूजा सामुग्रीत काही वस्तू अनुपलब्ध असल्यास त्याजागी अक्षता वाहल्या जातात.

चंदन : चंदन अर्थात शीतल. महादेव मस्तकावर चंदनाचा त्रिपुंड लावतात. चंदनाचा उपयोग हवनामध्ये केला जातो आणि यातून निघणार्‍या सुवासाने वातावरण प्रसन्न होऊन जातं. महादेवाला चंदन चढवल्याने मान सन्मान आणि यश वाढतं.

भस्म : याचा अर्थ पवित्रतेत लपलेला आहे, ती पवित्रता ‍जी महादेवाने एका मृत व्यक्तीच्या जळत असलेली चितामध्ये शोधली होती. जी आपल्या शरीराला लावून सन्मान दिला होता. असे म्हणतात की शरीराला भस्म लावून महादेव स्वत:ला मृत आत्म्याशी जोडतात. त्यांच्या प्रमाणे व्यक्तीला जाळल्यानंतर त्यात भस्मामध्ये जीवनाचा एकही कण शेष नसतं. न दुख, न सुख, न वाईटपणा आणि न चांगुळपणा. म्हणून ही भस्म पवित्र आहे, त्यात कोणत्याही प्रकाराचा गुण-अवगुण नाही. अशी भस्म महादेवा स्वत:च्या शरीराला लावून तिला सन्मानित करतात. 

रुद्राक्ष : महादेवाने रुद्राक्षच्या उत्पत्तीची गाथा पार्वती देवीला सांगितली आहे. एकदा महादेवाने एक हजार वर्षापर्यंत समाधी घेतली. समाधी पूर्ण झाल्यावर जेव्हा त्यांचे मन बाह्य जगात आले तेव्हा जगाचे कल्याण करण्याची कामना मनात ठेवणार्‍या महादेवाने आपले डोळे बंद केले. तेव्हा त्यांच्या नेत्रातून पाण्याचे थेंब पृथ्वीवर पडले. त्यातून रुद्राक्षाचे वृक्ष उत्पन्न झाले आणि महादेवाच्या इच्छेनुसार भक्ताच्या कल्याणासाठी समग्र देशात पसरून गेले.