एक चांदणी अकाली निखळली… - सुधीर मुनगंटीवार

मुंबई| Last Modified सोमवार, 26 फेब्रुवारी 2018 (11:48 IST)
अभिनेत्री श्रीदेवी यांच्या निधनाने सहज सुंदर अभिनयाने लाखो प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या
अभिनेत्रीला आज प्रेक्षक मुकले असून चित्रांगणाच्या नभातून एक सुंदर चांदणी अचानक निखळली असल्याची प्रतिक्रिया अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

सतत काही तरी नवं करण्याची ओढ, डोळ्यांमधील अवखळपणा आणि अभिनयातील सहजता यामुळे प्रत्येक भूमिका जिवंत करणाऱ्या श्रीदेवी यांनी तमिळ, तेलगू, मल्याळम, कन्नड, हिंदी अशा अनेक भाषांमधून चित्रपट केले. सदमा मधील त्यांचा अभिनय आज ही आपल्याला नि:शब्द करतो. चांदणी, नगिना, मि.इंडिया, लम्हे, खुदागवाह अशा अनेक चित्रपटांमधील त्यांच्या अभिनयाने प्रेक्षकांना खिळवून ठेवले होते. अलिकडच्या काळातील इंग्लिश विंग्लिश मधील त्यांची गृहिणीची भूमिका मनाला खूप स्पर्शून गेली. एका गृहिणीच्या मनातील घालमेल, तिची अस्तित्वाची लढाई सर्वांना भावली. मॉम मधून आई- मुलीच्या नात्याची एक सुंदर गुंफण त्यांनी विणली. त्यांच्या या अभिनय कारकीर्दीचा गौरव म्हणून त्यांना 2013 साली पद्मश्री देऊन गौरविण्यात आले होते. गंभीर भूमिकांप्रमाणेच प्रेक्षकांना खळखळून हसवण्याची किमया त्यांच्या अभिनयात होती. एक माणूस म्हणूनही त्या सदैव स्मरणात राहतील.
त्यांचे असे अकाली जाणे हे सर्व चाहत्यांसाठी धक्कादायक आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती प्रदान करो, असेही श्री.मनुगंटीवार यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.


यावर अधिक वाचा :

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय ...

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...
सप्तपुरींपैकी एक असलेली अयोध्या हिंदू, जैन, बौद्ध आणि शीख समुदायासाठी एक महत्त्वाचे ...

कुणकेश्वरचा इतिहास

कुणकेश्वरचा इतिहास
देवगडच्या दक्षिणेस 20 कि. मी. वर असलेले श्री क्षेत्र कुणकेश्वर निसर्गरम्य सौंदर्यस्थळ आणि ...

सफर निसर्गरम्य बूंदीची

सफर निसर्गरम्य बूंदीची
भटकंतीच्या दृष्टीने राजस्थानचं विशेष महत्त्व राहिलं आहे. राजस्थानमध्ये गेल्यावर जयपूर, ...

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

पलरुवी अर्थात  दुधाचा धबधबा
केरळमधील सगळ्यात सुंदर धबधब्यांपैकी एक आहे, जो 300 फूट उंचावरून खाली येतो. दक्षिण ...

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र
रामेश्वरम्, भारताच्या दक्षिण दिशेस बंगालच्या उपसागराच्या किनाऱ्यावर असणारे एक शहर. या ...

चंकी पांडेने मुलगी अनन्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत सुंदर ...

चंकी पांडेने मुलगी अनन्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत सुंदर फोटो शेअर केले
बॉलीवूड अभिनेत्री अनन्या पांडे आज आपला 22 वा वाढदिवस साजरा करत आहे. तिच्या वाढदिवसाच्या ...

सुझान-हृतिक पुन्हा येणार एकत्र?

सुझान-हृतिक पुन्हा येणार एकत्र?
अभिनेता हृतिक रोशनची पूर्वाश्रमीची पत्नी सुझान खान हिने तिच्या 49 व्या वाढदिवसानिमित्त ...

कलर्स वाहिनीकडून जाहीर माफीनामा सादर

कलर्स वाहिनीकडून जाहीर माफीनामा सादर
‘मराठीची चीड येते’ म्हणत मराठी भाषेचा अपमान करणे गायक जान कुमार सानूला चांगलेच महागात ...

अक्षय कुमारच्या FAU-G गेमचा टीझर रिलीज

अक्षय कुमारच्या FAU-G गेमचा टीझर रिलीज
FAU-G गेमची प्रतीक्षा संपली आहे. या गेमचा फर्स्ट लूक जारी झाला आहे. दसर्याच्या मुहूर्तावर ...

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात 'या' चित्रपटाचे शूटिंग

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात 'या' चित्रपटाचे शूटिंग
पुण्याच्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आवारामध्ये “नेल पॉलिश’ या चित्रपटाचे ...