मंगळवार, 4 नोव्हेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Modified: गुरूवार, 15 ऑक्टोबर 2015 (10:52 IST)

सानिया खेळाडू म्हणून प्रेरणादायक: शोएब

क्रिकेटपटू शोएब मलिक टेनिसपटू सानिया मिर्झा
कराची- इंग्लंडविरूद्धच्या पहिल्या कसो‍टीत शतक झळकविणारा पाकिस्तानचा क्रिकेटपटू शोएब मलिक याने टेनिसपटू व पत्नी सानिया मिर्झा माझ्यासाठी कायम खेळाडू म्हणून प्रेरणादायी राहिल्याचे म्हटले आहे. तब्बल पाच वर्षांनी कसोटी क्रिकेटमध्ये पुनरागमन करणार्‍या शोएब मलिकने शानदार नाबाद शतक ठोकत इंग्लंडविरूद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात पाकिस्तानच्या डावाला आकार दिला. शोएबने या वर्षभरात एकदिवसीय व ट्वेंटी-20 सामन्यांमध्ये सातत्वपूर्ण कामगिरी केलेली आहे. त्यामुळे त्याला कसोटी संघात स्थान देण्यात आले होते.