मंगळवार, 12 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Modified: शनिवार, 21 ऑगस्ट 2021 (19:16 IST)

20 वर्षांखालील जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप: अमित खत्रीने इतिहास (व्हिडिओ)रचला

amit-khatri
भारताच्या अमित खत्रीने केनियाची राजधानी नैरोबी येथे खेळल्या जाणाऱ्या अंडर -20 विश्व अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये इतिहास रचला. अमित शनिवारी 10,000 मीटर चालण्याच्या शर्यतीत रौप्य पदक जिंकण्यात यशस्वी झाला. या स्पर्धेतील भारताचे हे दुसरे पदक आहे. यापूर्वी भारताने 4X400 मीटर शर्यतीत कांस्यपदक जिंकले होते.
 
अमित खत्रीने हे अंतर 42 मिनिटे 17.49 सेकंदात पूर्ण केले. या स्पर्धेचे सुवर्णपदक केनियाच्या हेरिस्टोन व्हॅनियोनीकडे गेले, ज्यांनी निर्धारित अंतर 42.10 84 वेळेत पूर्ण केले. स्पेनच्या पॉल मॅकग्राने 42: 26.11 मध्ये अंतर कापून कांस्यपदक जिंकले. चालण्याच्या स्पर्धेत भारताने दोन पदके जिंकण्याची ही पहिलीच वेळ आहे. अमित सुरुवातीपासून आघाडीवर होता पण केनियाच्या धावपटूने त्याला शेवटच्या दोन फेऱ्यांमध्ये मागे ठेवले.