सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Modified: शनिवार, 4 सप्टेंबर 2021 (18:44 IST)

Tokyo Paralympics: प्रवीण भगतने बॅडमिंटनमध्ये सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला, मनोज सरकारने कांस्यपदक जिंकले

टोकियो पॅरालिम्पिकमध्ये भारतीय खेळाडूंनी चमक दाखवली. बॅडमिंटनमध्ये भारताला एकाच वेळी दोन पदके मिळाली आहेत. प्रमोद भगतने एकेरीच्या एसएल 3 वर्गाचा अंतिम सामना जिंकून या खेळातील देशातील पहिले सुवर्णपदक पटकावले आहे. त्याच वेळी, मनोज सरकारने याच प्रकारात कांस्यपदकावर कब्जा केला. अंतिम फेरीत ब्रिटनच्या डॅनियल बेथेलचा 21-14, 21-17 असा पराभव करून पॅरालिम्पिकमध्ये पदक जिंकणारा प्रमोद पहिला भारतीय शटलर ठरला. महत्वाचे म्हणजे की प्रथमच बॅडमिंटनचा समावेश पॅरालिम्पिक गेम्समध्ये करण्यात आला आहे. याआधी, मनीष नरवाल आणि सिंहराज यांनी नेमबाजीच्या पी 4 मिश्रित 50 मीटर पिस्तूल स्पर्धेत अनुक्रमे सुवर्ण आणि रौप्य पदके जिंकली. पॅरालिम्पिक 2020 मध्ये भारताच्या एकूण पदकांची संख्या आता 17 झाली आहे.