आशिया कप: भारतीय महिला हॉकी संघाचा चीनने पराभव करत सामना जिंकला
महिला हॉकी आशिया कप चीनमधील हांगझोऊ येथे आयोजित केला जात आहे. या स्पर्धेतील सुपर-4 सामन्यात भारतीय महिला हॉकी संघाला चीनकडून 4-1 असा पराभव पत्करावा लागला. या सामन्यात भारताकडून फक्त मुमताज खानला गोल करता आला. तिच्याशिवाय उर्वरित खेळाडूंना गोल करण्यात अपयश आले. चालू स्पर्धेत भारतीय महिला हॉकी संघाचा हा पहिलाच पराभव आहे.
चीनच्या महिला हॉकी संघाने सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ दाखवला. चौथ्या मिनिटाला झोउ मीरोंगने चीनला आघाडी मिळवून दिली. त्यानंतर 31 व्या मिनिटाला चेन यांगने गोल केला. यामुळे चीनने 2-0 अशी आघाडी घेतली.
दुसऱ्या क्वार्टरमध्येही अनेक संधी मिळाल्या पण दोन्ही संघांना गोल करता आला नाही. 27 व्या मिनिटाला भारताला आणखी एक पेनल्टी कॉर्नर मिळाला पण तो पुन्हा अपयशी ठरला. तिसऱ्या क्वार्टरच्या पहिल्या मिनिटाला चीनने गोल करून दबाव वाढवला. शेवटच्या क्वार्टरमध्ये चीनने 47 व्या मिनिटाला मिळालेल्या पेनल्टी कॉर्नरचे गोलमध्ये रूपांतर केले.
सुपर 4 मधील अव्वल दोन संघ14 सप्टेंबर रोजी अंतिम फेरीत खेळतील. आशिया कपमधील विजेत्या संघाला बेल्जियम आणि नेदरलँड्समध्ये होणाऱ्या 2026 च्या महिला विश्वचषकात थेट प्रवेश मिळेल. भारतीय संघाला आता त्यांचा पुढचा सामना जपानविरुद्ध खेळायचा आहे
Edited By - Priya Dixit