बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Modified: लंडन , सोमवार, 15 जुलै 2019 (10:19 IST)

जोकोविच 5व्यांदा बनला विम्बल्डनचा बादशहा, 5 तासापर्यंत चाललेल्या सामन्यात फेडररचा केला पराभव

जगातील नंबर 1 खेळाडू आणि गत चॅम्पियन सर्बियाचा नोवाक जोकोविचने श्वास थांबवणार्‍या फारच रोमांचक सामन्यात 20 ग्रँड स्लेम विजेते स्विटजरलँडच्या रोजर फेडररला 7-6, 1-6, 7-6, 4-6, 13-12 ने पराभूत करून पाचव्यांदा विम्बल्डन टेनिस चँम्पियनशिपचा किताब आपल्या नावावर केला.  
 
जोकोविचने चार तास 55 मिनिटापर्यंत चाललेल्या मेराथन सामन्यात ग्रास कोर्ट किंग फेडररचा पराभव केला.
 
फेडरर व जोकोविच तिस-यांदा विम्बल्डनच्या अंतिम सामन्यात समोरासमोर आले होते. यापुर्वी 2014 व 2015 मध्ये झालेल्या सामन्यातही जोकोविचने फेडररवर मात केली होती. पहिल्या सेटमध्ये दोन्ही खेळाडूंनी आपली सर्व्हिस राखली. यादरम्यान फेडररलाच 2-1 या स्कोअरवर एक ब्रेकपॉईट मिळाला. 
 
दुसर्‍या सेटमध्ये फेडररने आक्रमक पावित्रा घेतला. त्याने जोकोविचच्या दोन्ही सर्विस ब्रेक करत 4-0 अशी आघाडी घेतली. जोकोविचला दुसर्‍या सेटमध्ये केवळ दोनच विनर मारता आले. सिºया सेटमध्ये जोकोविच टायब्रेकरवर अव्वल ठरला. चौथ्या सेटमध्ये पुन्हा  फेडररने बाजी मारली. फेडररने दोनवेळा जोकोविचची सर्विस ब्रेक केली. हा सेट जिंकून फेडररने सामना निर्णायक सेटमध्ये नेला.
 
पाचव्या व निर्णायक सेटमध्ये जोकोविचने फेडररची सर्विस तोडतत 4-2 अशी आघाडी घेतली. मात्र फेडररने ब्रेक पॉईट घेत सामना 4-4 असा बरोबरीत आणला. 15 व्या गेममध्ये फेडररन जोकोविचची सर्विस तोडण्यात यशस्वी ठरला. त्यानंतर लगेचच दोन पॉईंट घेतले. मात्र जोकोविचने शानदार खेळ करत सामन्यात रंगत आणली. त्याने सामना 8-8 असा बरोबरीत आणला. यानंतर नव्या नियमानुसार 12-12 असा टायब्रेकर झाला. यात बाजी मारत जोकोविचने आपले 16 वे ग्रॅँडस्लॅम जिंकले.
 
जोकोविच आणि फेडररमध्ये करियरचा हा 48वा सामना होता. जोकोविचने या विजयासह फेडररवर 26-22ची बढत बनवली आहे. 37 वर्षीय फेडरर ओपन युगलमध्ये ग्रँड  स्लेम चँम्पियनशिपच्या फायनलमध्ये पोहोचणारा तिसर्‍या सर्वात जास्त वय असणारा खेळाडू बनला होता पण शेवटी तो किताब मिळवू शकला नाही. जोकोविचने वर्ष 2014 आणि 2015च्या विम्बल्डन फायनलमध्ये देखील फेडररचा पराभव करून हा किताब जिंकला होता.