1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Modified: रविवार, 10 जुलै 2022 (10:39 IST)

Wimbledon 2022: एलेना रायबाकिना बनली विम्बल्डनची नवीन चॅम्पियन, विजेतेपद जिंकणारी कझाकिस्तान आणि आशियातील पहिली खेळाडू ठरली

Wimbledon 2022
फोटो साभार -सोशल मीडिया रशियात जन्मलेल्या पण कझाकिस्तानचं प्रतिनिधित्व करणाऱ्या एलेना रायबाकिनाने विम्बल्डन स्पर्धेच्या जेतेपदावर कब्जा केला. अंतिम लढतीत एलेनाने ट्यूनिशियाच्या ऑन्स जबेरवर 3-6, 6-2, 6-2 अशी मात केली.रिबाकिनाचे हे पहिले ग्रँडस्लॅम जेतेपद आहे. 17व्या मानांकित कझाकिस्तानच्या रिबाकीनाने एक तास 48 मिनिटे चाललेल्या अंतिम फेरीत तिसऱ्या मानांकित ट्युनिशियाच्या ओन्स जेबुआरकडून पहिला सेट गमावून पुनरागमन केले. यासह रिबाकिना विम्बल्डनचे विजेतेपद जिंकणारी कझाकिस्तान आणि आशियातील पहिली खेळाडू ठरली आहे.दरम्यान, ट्युनिशियाची 27 वर्षीय जेबुआर ही अरब आणि आफ्रिकन देशांतून अंतिम फेरीत पोहोचणारी पहिली महिला ठरली.
 
विम्बल्डन आयोजकांनी यंदा रशिया आणि बेलारुसच्या खेळाडूंवर बंदी घातली. युक्रेनविरोधात युद्ध पुकारल्याने हा कारवाईचा निर्णय घेण्यात आला. रशियात जन्मलेली एलेना 2018 पर्यंत रशियाचंच प्रतिनिधित्व करत होती मात्र त्यानंतर ती कझाकिस्तानकडून खेळते आहे. कझाकिस्तानतर्फे खेळत असल्याने एलेना यंदा स्पर्धेत खेळता आलं.
 
ऑन्स जबेरने सेमी फायनलच्या लढतीत तातयाना मारियावर 6-2, 3-6, 6-1 असा विजय मिळवत अंतिम फेरी गाठली होती. ग्रँड स्लॅम एकेरीच्या अंतिम फेरीत धडक मारणारी ऑन्स ही पहिलीच आफ्रिका/अरब प्रांतातली महिला खेळाडू ठरली आहे.
 
रिबाकिनाच्या कारकिर्दीतील हे तिसरे विजेतेपद आहे. होबार्ट 2020 नंतर ते चार विजेतेपदाचे सामने गमावले. तिला टोकियो ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदकही गमवावे लागले. त्याच वेळी, ओन्स जेबुआर देखील प्रथमच ग्रँडस्लॅमच्या अंतिम फेरीत पोहोचली होती .