मंगळवार, 9 सप्टेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Modified: गोल्ड कोस्ट , शुक्रवार, 13 एप्रिल 2018 (12:27 IST)

CWG 2018 : नेमबाजीत अनीष भानवाला सुवर्ण

games2018
21 व्या राष्ट्रकुल स्पर्धेत नेमबाज अनिश भानवाला याने पुरुषांच्या 25 मीटर रॅपीड पिस्टल प्रकारात सुवर्णपदक पटकावले आहे. 30 गुणांच्या कमाईसह अनिशने सुवर्णपदकावर आपले नाव कोरले आहे.
 
अनिश भानवाला अवघ्या 15 वर्षांचा आहे. त्यामुळे अनिश राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक पटकावणारा सर्वात तरुण भारतीय ठरला आहे. 21 व्या राष्ट्रकुल स्पर्धेच्या नवव्या दिवशी भारताच्या पदकांची संख्या 34 वर पोहचली आहे. त्यात 16 सुवर्णपदकांचा समावेश आहे.