गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Modified: बुधवार, 13 सप्टेंबर 2023 (23:02 IST)

Hong Kong Open: तनिषा-अश्विनी प्री-क्वार्टर फायनलमध्ये

Badminton
तनिषा क्रास्टो आणि अश्विनी पोनप्पा या भारताच्या बॅडमिंटन जोडीने हाँगकाँग ओपन सुपर 500 स्पर्धेच्या महिला दुहेरीच्या प्री-क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश केला आहे. दोन्ही खेळाडूंनी चायनीज तैपेईच्या ली चिया हसिन आणि टेंग चुन सुन यांचा 21-19, 21-19 असा सरळ गेममध्ये पराभव केला. दरम्यान, आशियाई क्रीडा स्पर्धेत सहभागी होण्यासाठी निघालेल्या लक्ष्य सेनने कंबरेला ताण आल्याने स्पर्धेतून आपले नाव मागे घेतले. 
 
प्रियांशु राजावत चा पुरुष एकल मध्ये जपानच्या कांता सुनेयामा याने  21-13, 21-14 असा पराभव केला. त्याचवेळी, आकर्षि  कश्यपला जर्मनीच्या वोन लीने 21-18, 21-10  असे पराभूत केले. मालविका बनसोडेने चीनच्या झांग यी मॅनचा 21-14, 21-12 असा पराभव केला. पुरुष दुहेरीत कृष्णा प्रसाद गारागा आणि विष्णुवर्धन गौड पंजाला यांना कोरियाच्या को सुंग ह्यून आणि शिन बेक चोएल यांनी 21-14, 21-19 ने पराभूत केले. मिश्र दुहेरीत बी सुमीथ रेड्डी आणि अश्विनी पेनप्पा यांना मलेशियाच्या चेन तांग जी आणि तो वेई वेईकडून 16-21, 21-16, 18-21 असा पराभव पत्करावा लागला. रोहन कपूर आणि एन सिक्की रेड्डी यांना सिंगापूरच्या ही योंग केई टेरी आणि टॅन वेई हान जेसिका यांनी 21-19, 21-10 ने पराभूत केले. 
 


Edited by - Priya Dixit