Widgets Magazine

दिवाळीचा फराळ केला नाही रेश्माने

Reshma mane
Last Modified सोमवार, 7 नोव्हेंबर 2016 (12:22 IST)
नवी दिल्ली- राष्ट्रकुल स्पर्धेत रेश्मा मानेला सिंगापूरमध्ये 63 किलो वजनी गटशत खेळायचे होते. त्यामुळे वजन कोण्यातही परिस्थितीत वाढणा नाही, याकडे तिचा कटाक्ष होता. त्यामुळे गेल्या काही दिवसांत तिने अतिशय काटेकोरपणे आपला डायट सांभळला.
दिवाळीचा फराळ केलास का? या प्रश्नावर तिने चिवडा, चकली आवडते पण त्याला या वर्षी हातही लावला नाही. एखाद्या खेळाडूला पुढे जायचे असेल, तर त्याने या गोष्टी टाळायलाच हव्यात, अशी प्रतिक्रिया रेश्माने दिली होती.

रेश्माची मेहनत पाहता, तिचे हे यश अपेक्षित होते. गोंदा येथील कामगिरीनंतर तिचा आ‍त्मविश्वास दुणावला होता.


यावर अधिक वाचा :