गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Modified: शनिवार, 10 डिसेंबर 2022 (22:22 IST)

धावपटू पीटी उषा यांनी इतिहास रचला,भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या पहिल्या महिला अध्यक्षपदी निवड

भारताची महान धावपटू पीटी उषा हिने शनिवारी (10 डिसेंबर) इतिहास रचला. त्या भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या (IOA) पहिल्या महिला अध्यक्षा झाल्या. निवडणुकीत त्यांची बिनविरोध अध्यक्षपदी निवड झाली. 1960 नंतर प्रथमच एखादा खेळाडू आयओएचा अध्यक्ष बनला आहे. महाराजा यादविंदर सिंग (1938-1960) हे शेवटचे अध्यक्ष होते जे एक क्रीडापटू होते.

पीटी उषाच्या नावावर आशियाई क्रीडा स्पर्धेत चार सुवर्ण आणि सात रौप्य पदके आहेत. तिने 1982, 1986, 1990 आणि 1994 आशियाई क्रीडा स्पर्धेत पदके जिंकली. याशिवाय त्याच्या नावावर आशियाई चॅम्पियनशिपमध्ये 14 सुवर्ण, सहा रौप्य आणि तीन कांस्यपदके आहेत. 58 वर्षीय पीटी उषा 1984 ऑलिम्पिकमध्ये 400 मीटर अडथळा शर्यतीच्या अंतिम फेरीत चौथ्या स्थानावर राहिली होती.
 
Edited by - Priya Dixit