1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Modified: दुबई , मंगळवार, 18 फेब्रुवारी 2020 (17:05 IST)

दुखापतीतून सावरलेल्या सानियाचे दुबई ओपनद्वारे पुनरागन

sania mirza
भारताची स्टार टेनिस खेळाडू सानिया मिर्झा पिंडरीच्या दुखापतीतून सावरल्यानंतर बुधवारी दुबई ओपनमध्ये पुनरागन करेल. पिंडरीला झालेल्या दुखापतीमुळे सानियाला जानेवारीत ऑस्ट्रेलियन ओपनमधून मध्येच बाजूला व्हावे लागले होते. 
 
33 वर्षीय सानिया या टुर्नामेंटमध्ये फ्रान्सची कॅरोलिन गार्सियासह स्पर्धेत उतरणार आहे. ही जोडी महिलांच्या दुहेरीत पहिल्या फेरीत बुधवारी रशियाच्या एला कुद्रियावत्सेवा आणि स्लोवेनियाची कॅटरिना सरेबॉटनिक या जोडीला भिडेल. सानियाने सांगितले की, दुखापतीमुळे ग्रँडस्लॅम टुर्नांमेंटमधून मध्येच बाहेर पडणे हे दुःखद होते. विशेष करून ज्यावेळी तुम्ही बर्‍याच कालावधीच्या विश्रांतीनंतर पुनरागमन करत असता या स्पर्धेसाठी मला तंदुरूस्त करणारे माझे फिजियो डॉ. फैजल हयात खान यांची मी आभारी आहे. 
 
मी सराव सुरू केला आहे आणि टुर्नामेंटमध्ये चांगली कामगिरी करण्यासाठी उत्सुक आहे. आई झाल्यानंतर दोन वर्षांनी सर्किटवर पुनरागमन करणार्‍या सानियाला उजव्या पायाच्या पिंडरीला दुखापत झाली होती. त्यामुळे तिने आपल्या पहिल्या ग्रँडस्लॅम टुर्नांमेंटच्या महिला दुहेरीतील पहिल्या फेरीतील सामना सोडून दिला होता. विश्रांतीनंतर शानदार पुनरागनम करणार्‍या सानियाने आणि युक्रेनची तिची साथीदार नादिया किचेनोकने होबार्ट इंटरनॅशनलचा दुहेरीचा किताब जिंकला होता.