Widgets Magazine
Widgets Magazine

चेक बॉक्‍सिंग स्पर्धेत भारताला सुवर्ण

नवी दिल्ली, सोमवार, 31 जुलै 2017 (11:19 IST)

shiv thaka boxing

भारतीय मुष्टियोद्धांनी चेक गणराज्यच्या 48व्या ग्रां प्री उस्ती नाद लाबेम चॅम्पियशीप स्पर्धेत शानदार प्रदर्शन करत पाच सुवर्ण, दोन रौप्य आणि एका कांस्य पदक जिंकले. वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेतील कांस्यपदक विजेता शिव थापा (60 किलो), राष्ट्रकुल स्पर्धेतील सुवर्णपदक विजेता मनोज कुमार (69 किलो), अमित फंगल (52 किलो), गौरव बिधूरी (56 किलो) आणि सतीश कुमार (91 किलोहून अधिक) यांनी अंतिम फेरीत आपापल्या प्रतिस्पर्धींना पराभूत करत सुवर्णपदक पटकाविले.
 
कविंदर बिष्ट (52 किलो) आणि मनीष पंवार (81 किलो) यांना रौप्य पदकावरच समाधान मानावे लागले. तसेच सुमित सांगवान याचा उपान्त्य फेरीत पराभव झाल्याने त्याला कांस्य पदक मिळले.
 
अमित आणि कविंदर या दोघा भारतीय मुष्टियोद्धांमध्ये अंतिम सामना झाला. या दोघांमधील अमित हा लाईट फ्लाईवेटमध्ये (49 किलो) खेळतो. मात्र, या स्पर्धेत तो फ्लाईवेटमध्ये खेळला. त्याने कविंदरला 3-2 असे हरविले. त्यानंतर गौरवने पॉलंडच्या इवानो जारोस्लाववर 5-0 अशी सहज मात केली.Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

खेळ मराठी

news

पीव्ही सिंधू बनली उपजिल्हाधिकारी

रियो ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक पटकावणाऱ्या पी.व्ही .सिंधूहीची आंध्र प्रदेश सरकारने ग्रुप 1 ...

news

महिलांनी झेप घेण्याची गरज – सानिया

भारतातील महिला टेनिसला अधिक उंच झेप घेण्याची गरज निर्माण झाली असल्याचे प्रतिपादन अव्वल ...

news

महाराष्ट्राच्या बापू कोळेकरला आशियाई कुस्ती स्पर्धेत कांस्य

महाराष्ट्राच्या बापू कोळेकरने आशियाई कुस्ती स्पर्धेत कांस्यपदक पटकावून चमकदार कामगिरी ...

news

अमेरिकन ओपन बॅडमिंटन स्पर्धा

भारताच्याच दोन खेळाडूंमध्ये पार पडलेल्या अत्यंत रंगतदार अंतिम लढतीत बाजी मारताना द्वितीय ...

Widgets Magazine