सोमवार, 3 नोव्हेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Modified: बुधवार, 15 जून 2022 (20:53 IST)

Khelo India Games:खेलो इंडियाच्या खेळाडूंना ही साई देणार पॉकेटमनी

Khelo India Games
भारतीय क्रीडा प्राधिकरणाने (SAI) खेलो इंडिया युथ गेम्समध्ये सहभागी होणाऱ्या 2189  खेळाडूंसाठी 6.52  कोटी रुपयांची तरतूद केली आहे. एप्रिल ते जून या कालावधीत हे पैसे खेळाडूंना पॉकेटमनी म्हणून दिले जाणार आहेत. साई एका खेळाडूच्या पॉकेटमनीसाठी 29785 रुपये खर्च करत आहे. पॅरा अॅथलीट्ससह सर्व 21 श्रेणीतील खेळाडूंना हे पैसे दिले जातील. 
 
SAI कडून सांगण्यात आले की वार्षिक खेलो इंडिया शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत मान्यताप्राप्त प्रशिक्षण केंद्रात सराव करणाऱ्या प्रत्येक खेळाडूला 6.28 लाखांची आर्थिक मदत देण्यात आली आहे. यामध्ये 1.20 लाखांच्या खिशाबाहेरील खर्चाचाही समावेश आहे. 
 
खिशाबाहेरील खर्चासाठी वार्षिक 1.20 लाख रुपये थेट खेळाडूंच्या बँक खात्यात जमा केले जातील. त्याचबरोबर उर्वरित रक्कम खेळाडूंच्या प्रशिक्षण, भोजन, राहणीमान आणि शिक्षणावर खर्च करण्यात येणार आहे. खेळाडूला खेलो इंडिया अकादमीमध्ये राहावे लागेल, जिथे त्यांना प्रशिक्षण दिले जाईल. 
 
घरी जाण्यासाठी भाडे देखीलसाई देणार- 
 साईने भरावे लागणार्‍या खर्चात घरी जाण्याचे भाडे समाविष्ट आहे. याशिवाय खेळाडूच्या जेवणाचे पैसे आणि इतर खर्चही साईच करणार आहे. खेलो इंडिया टॅलेंट डेव्हलपमेंट स्कीम अंतर्गत यासाठी पैसे देण्यात आले आहेत.