रविवार, 26 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कसे कराल
Written By
Last Modified: गुरूवार, 17 सप्टेंबर 2020 (09:38 IST)

पैसे सुरक्षित ठेवायचे असल्यास या गोष्टी लक्षात असू द्या, अन्यथा खाते होणार रिकामे

कोरोना काळात भारत सरकार आणि आरबीआय देशात डिजीटल व्यवहारांना प्रोत्साहन देत आहे. वर्ष 2021 पर्यंत देशात डिजीटल व्यवहार चौपाटीने वाढण्याची अपेक्षा आहे. भारतात लोक डिजीटल व्यवहारासाठी UPI म्हणजे यूनिफाईड पेमेंट्स इंटरफेस, डेबिट कार्ड, नेट बँकिंग, इत्यादींचा वापर करीत आहे. यूपीआय च्या मार्फत दर महिन्यात कोट्यवधींचे व्यवहार केले जाते. परंतु आता प्रश्न उद्भवतो की व्यवहाराचे हे साधन किती सुरक्षित आहे.
 
भारतीय रिझर्व बँक(RBI) चे कडक नियम असून ही बँकांमध्ये फसवेगिरी होतेच. फसवेगिरी करणारे लोक सामान्य माणसाला लुटण्याचा मार्ग शोधूनच घेतात. डिजीटल व्यवहार ग्राहकांसाठी फायदेशीर होण्याच्या बरोबरच धोकादायक देखील आहे. देशात तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे ऑनलाईन फसवणूक वाढतच चालली आहे. 
 
सायबर क्राईमच्या घटना समोर येतं आहे. या मध्ये लोकांच्या खात्यामधून कोट्यवधीने रुपये काढून घेतात. म्हणून आज आम्ही आपणास सुरक्षित व्यवहारासाठी काही महत्त्वाच्या गोष्टी सांगत आहोत, ज्याद्वारे आपण फसवणुकीला बळी पडणार नाही.
 
नेहमीच OTP विकल्प निवडा.
सायबर हल्ल्यासाठी फिशिंग अटॅक ही सर्वात जुनी आणि सोपी पद्धत आहे. फिशिंग अटॅक मध्ये ग्राहकाच्या ईमेल आयडी हॅक केले जाते. या साठी हॅकर्स आपल्या मित्रांच्या नावावर फसवी आणि बनावटी ई-मेल पाठवतात. ज्यामध्ये व्हायरसची लिंक असते. फसवणुकीपासून वाचण्यासाठी आपण अश्या कोणत्याही फिशिंग ई-मेल ला क्लिक करू नये आणि ऑनलाईन देयकांमध्ये नेहमी OTP (वन टाइम पासवर्डचा विकल्प) निवडा. हा ओटीपी कोणालाही सांगू नका. कोणतीही बँक आपल्याकडून कधीही ओटीपी मागत नाही. या मुळे फसवणुकीची शक्यता कमी होते.
 
सुरक्षित असलेले ऍप्लिकेशनच वापरावे -
हानिकारक असणारे ऍप्लिकेशन किंवा अनुप्रयोग आपल्या फोनच्या माध्यमातून आपली खाजगी माहिती मिळवू शकतात. त्यात देय माहिती देखील समाविष्ट आहे. आपल्याला अश्या फसव्या ऍप्लिकेशन पासून वाचावे. आपल्या यूपीआय पिन सुरक्षित ठेवा कारण हे फसवे असू शकतात. सावधगिरी साठी भीम युपीआय सारख्या सुरक्षित ऍप्लिकेशन वरच यूपीआय पिन वापरा. जे एखाद्या वेबसाईट किंवा फॉर्म मध्ये यूपीआय पिन घालण्यासाठीची लिंक देण्यात आली असल्यास तर त्या पासून सावध राहा.
 
कोणालाही काहीच माहिती देऊ नका - 
आपल्या क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्ड चा नंबर आणि cvv कोणालाही सांगू नका. बँक कधीही आपल्याकडून ही माहिती मागत नाही. आपला यूपीआय पिन देखील एटीएमच्या पिन सारखा असतो. म्हणून हे कोणाबरोबर देखील सामायिक करू नका. असे केल्यास फसवे त्याचे दुरुपयोग करू शकतात. आणि आपली फसवणूक करू शकतात. 
 
बँकेला फसवणुकीचा अहवाल द्या -
जर का आपल्या बरोबर फसवणूक झाली असल्यास त्वरितच बँकेला कळवावे. असे केल्याने बँक आपल्या झालेल्या नुकसानाची जबाबदारी घेऊ शकते. जर का आपल्या डेबिट किंवा क्रेडिट कार्डमधून पैसे काढले असल्यास, कार्डाला लगेचच ब्लॉक करा.