शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कसे कराल
Written By
Last Modified: गुरूवार, 24 डिसेंबर 2020 (11:41 IST)

अवयवदान करण्यापूर्वी हा गोष्टी जाणून घ्या

या प्रक्रियेत जैविक उती किंवा अवयवांना एका मृत व्यक्तीच्या किंवा जिवंत व्यक्ती कडून प्राप्त करून दुसऱ्या गरजू व्यक्तीच्या शरीरात लावले जाते, ज्याची त्याला आवश्यकता असते, या प्रक्रियेला अवयवदान असे म्हणतात. अवयव लावण्याची प्रक्रिया हार्वेस्टिंग म्हणवली जाते. अवयव दान केल्यामुळे कोणाचेही आयुष्य वाचवले जाऊ शकतात. पण भारतात या बद्दल काही गैरसमज आणि अज्ञानते मुळे अवयवदानाची टक्केवारी तितकी जास्त नाही जितकी असायला हवी. अवयवदाते नसल्यामुळे अवयवाची आवश्यकता असणारे लोक मरण पावतात. हे काही कारणे आहेत ज्यामुळे अवयवदान करणाऱ्या लोकांमध्ये अंतर आहे.
 
1 रस्त्याच्या अपघातांमध्ये मरण पावलेल्या त्याच लोकांचे अवयव काढले जाऊ शकतात ज्यांची मृत्यू रुग्णालयात होते.
2 लोकांना आयुष्यात अवयव दान करण्याची इच्छा नसते.
3 जागरूकतेचा अभाव.
4 धार्मिक रूढी आणि मान्यता बद्दलचा विश्वास आणि गैरसमज देखील माणसाला अंग दान किंवा अवयव दान करू देण्यास अडथळा आणतात. 
 
ही वेळ लोकांना अवयवदान करण्याच्या महत्त्वाला पटवून देण्याची आहे, जेणे करून त्यांच्या लक्षात आणणे महत्त्वाचे आहे की त्यांच्या मृत्यूच्या नंतर ते किमान 8 लोकांना नवे आयुष्य देऊ शकतात.
 
अवयवदान म्हणजे काय ?
अवयवदानाचे दोन प्रकार आहे 
 
1 जिवंत दाता
* या मध्ये जीवित व्यक्ती आपल्या अवयवांना दान करतं.
* जिवंत असताना लिव्हर आणि मूत्रपिंड आणि दुर्मिळ परिस्थितीत स्वादुपिंड, आंतड्या आणि फुफ्फुसांचा एक भाग देखील दान दिला जाऊ शकतो.
* ही देणगी दान देणाऱ्या आणि प्राप्त करणाऱ्या कुटुंबांचा निकषाच्या आधारित असावी. 
 
2 मृत दाता -
* जस की नावानेच कळते की इथे मृत किंवा मृत मेंदू असलेल्या व्यक्तीचे अवयव मिळतात.
* मृत मेंदूची मेंदू नळी निष्क्रिय होते. या मध्ये स्वैच्छिक श्वसन क्रिया नाही होतं.
* एक नोंदणीकृत तारण म्हणून दात्याची संमती किंवा त्यांच्या कुटुंबीयांची अवयवाला दान देण्याची संमती आवश्यक आहे.
* जरी मृत व्यक्तीने अवयव दान दिल्याचे वचन दिले असेल, तरी ही कुटुंबाची संमती आवश्यक आहे.
 
जीवित असताना दान केले जाणारे अवयव -
* यकृत - यकृतामध्ये पुनः निर्माणाची क्षमता असते, जर यकृताचा एक भाग दान दिला तर ते वाढून पूर्ववत स्थितीत येतो.
 
* मूत्रपिंड - एका मूत्रपिंडाने देखील माणूस जिवंत राहू शकतो. म्हणून एक मूत्र पिंड दान केले जाऊ शकतात.
 
* फुफ्फुस - फुफ्फुसांचा एक भाग दान दिला जाऊ शकतो. हे यकृताच्या उलट असते, कारण फुफ्फुसांमध्ये पुनर्निर्माणाची क्षमता नसते.
 
* स्वादुपिंड - याचा क्रियाशीलतेला लक्षात घेता, अग्नाशयचा किंवा स्वादुपिंडाचा एक भाग दान करू शकतो.
 
* आंतड्या - दुर्मिळ प्रसंगी देणगीदारांच्या आतड्याचा एक भाग दान दिला जाऊ शकतो.
 
* कोण अवयव दान करू शकत नाही -
कर्करोग आणि एचआयवीने ग्रस्त व्यक्ती आणि सेप्सीस (सडलेल्या जखमा) किंवा इंट्राव्हेन्स (आयव्ही) औषधे वापरणारे व्यक्ती सक्रिय संसर्गामुळे आपले अवयव दान करू शकत नाही. पण मृत शरीरातून अवयव आणि उती काढल्या जाऊ शकतात.
 
* मूत्रपिंड - प्रत्यारोपण केलेले मूत्रपिंड 9 वर्ष काम करतो.
 
* यकृत - एका यकृतात पुनर्निर्माण करण्याची क्षमता असते हे काढल्यावर दोन माणसांमध्ये प्रत्यारोपित केले जाऊ शकते. म्हणजे एका यकृताचा फायदा दोन लोक घेऊ शकतात.
 
* फुफ्फुसे - एक किंवा दोन्ही फुफ्फुसांना प्रत्यारोपित केले जाऊ शकते.
 
* स्वादुपिंड, आंतड्या, रक्तवाहिन्या, रक्त आणि प्लेटलेट्स ऊतक -हे अवयव मृत्यू झाल्याच्या 24 तासांत दान केले जाऊ शकते.
 
* कॉर्निया - कॉर्निया हे मृत्यू झाल्याच्या 24 तासातच दान करता येतो असे म्हणतात की एक मृत माणसाचा कॉर्निया दोन अंध लोकांच्या आयुष्याला उजळवू शकतो.
 
* हाडे, त्वचा, शिरा, टेण्डन, अस्थिबंधन, हृदयाचे व्हॉल्व, कार्टिलेज किंवा कूर्चा - देणगी दाराच्या शरीरातून काढलेले हे अवयव 6 ते 72 तासाच्या आतच प्रतिस्थापित केले पाहिजे.
 
तर कॉर्निया, त्वचा, हृदयाचे व्हॉल्व्ह, हाडे, टेण्डन, अस्थिबंधन आणि कार्टिलेज सारखे ऊतक किंवा उती नंतर उपयोगात घेण्यासाठी संरक्षित आणि संग्रहित केले जाऊ शकते.
 
* वयोमर्यादा- सामान्य आरोग्य असणारी कोणतीही व्यक्ती आपल्या अवयवांना दान करू शकते.
 
अवयव दान करण्याची प्रक्रिया -
* आपल्या आयुष्यात एखादी व्यक्ती आपल्या अवयवांना दान करण्याची प्रतिज्ञा घेऊ शकतो. या साठी त्यांना देणगी कार्ड प्रदान केले जाते. 
 
* अवयवांना दान करण्याच्या वेळी व्यक्तीकडे देणगी कार्ड असणे आणि आपल्या कुटुंबीयांना माहिती देणे बंधन कारक आहे.
 
* मेंदू मृत झालेल्या रुग्णाच्या बाबतीत, अवयव दान करण्याच्या नियमांसह मानवी अवयव प्रत्यारोपण कायदा बनविला आहे. या कायद्या मध्ये ठरविलेल्या कार्य पद्धतीच्या व्यतिरिक्त, कायदेशीर अधिकाऱ्याला अवयव काढण्याच्या पूर्वी कुटुंबाची परवानगी आणि कोरोनरची आवश्यकता असते. कायदेशीर औपचारिकता असलेल्या प्रक्रियेत, रुग्णाला व्हेंटिलेटर वर जिवंत ठेवतात. 
 
* अशा रुग्णांचे जवळचे नातेवाईक त्याच्या अवयवांना दान करू शकतात.
 
भारतात अवयवदान दिवस -
एका अध्ययनावरून आढळलेले आहे की भारतात दरवर्षी अवयवांचे कार्य न करणे आणि अवयवांच्या कमी उपलब्धते मुळे सुमारे 5 लाख लोकांची मृत्यू होते. अवयवदान दिवस किंवा अंगदान दिवस हे विविध लोक, सरकारी आणि स्वयंसेवी संस्था आणि इतर बऱ्याच संस्थांद्वारे साजरा केला जातो. या संस्था लोकांमध्ये अवयव दानाचे महत्त्व सांगून आणि जागरूकता निर्माण करून त्यांना अवयवदानाकडे प्रवृत्त केले जाते. असे म्हणतात की एक अवयवदाता सुमारे 8 लोकांचे आयुष्य वाचवू शकतो. या साठी आपण ऑनलाईन नोंदणी करू शकता. किंवा खालील संस्थेमध्ये अवयवदान करू शकता. 
 
* मोहन फाउंडेशन
* गिफ्ट योर ऑर्गन फाउंडेशन
* शतायु
* उपहार एक जीवन
 
चला तर मग ही वेळ आहे जुन्या मिथक कहाण्यांना विसरून, विज्ञानावर विश्वास ठेवून संकटात असलेल्या गरजूंना मदत करण्याची. ही जाणीव करण्याची की आपण जिवंत पणे तर सर्वांची मदत करतोच, तर मृत्यू पश्चात देखील कोणाच्या कामी येण्याची प्रतिज्ञा करू या. 
 
अवयव दान करण्यापूर्वी हे लक्षात ठेवा -
* अवयवदान हे मेंदूच्या मृत्यूच्या बाबतीतच होते जे एखाद्या माणसाच्या मृत्यू पश्चात रुग्णालय घोषित करते.
 
* हेच ते रुग्णालय असते जेथे मृत्यू झालेल्या व्यक्तीवर उपचार सुरू होते. हे कार्य त्याचे सल्लागार, ट्रान्सप्लांट कोऑर्डिनेटर आणि डॉक्टरांच्या पर्यवेक्षण खाली केले जाते.
 
* आपण अवयवदान देण्याची इच्छा बाळगत असाल तर या स्थितीत आपल्याला संस्थेमध्ये नोंदणी केल्यावर एक कार्ड दिले जाते. जे दर्शवतात की आपली अवयव दान करण्याची इच्छा आहे.
 
* असे आवश्यक नाही की ज्या संस्थेला आपण अवयवदान करू इच्छित आहात, त्या संस्थेला या प्रक्रिया संबंधी योग्य माहिती आहे. 
 
* मेंदू मृत झाल्याच्या स्थितीमध्ये रुग्णालय कुटुंब आणि डोनरच्या सल्लागाराशी संपर्क साधून कुटुंबाचे मत जाणून घेतो.
 
* भारतात सध्या डोनरच्या कुटुंबाचे लोक ठरवतात की ते अवयवदान करू इच्छित आहे किंवा नाही. एवढेच नव्हे तर आपण जरी अवयवदान करण्याचे वचन दिले असेल तरी ही कुटुंबाच्या परवानगी शिवाय अवयवदान केले जाऊ शकत नाही.
 
* अवयव दाता कुठे ही नोंदणी करण्यापूर्वी आपल्या कुटुंबीयाशी चर्चा करणे आवश्यक आहे. जेणे करून ते आपल्या मृत्यूपश्चात आपली इच्छा पूर्ण करू शकतील.
 
* बऱ्याच वेळा असे आढळून आले आहे की कुटुंबीयांनी व्यक्तीच्या मृत्यूच्या पश्चात देखील अवयव दान करण्यास नकार दिला, कारण त्या व्यक्तींनी या संदर्भात कधीच सांगितले नव्हते. अशा परिस्थितीत अवयवदान करण्याचा निर्णय घेणं अवघड असतं.
 
* अवयवदानासाठी नोंदणी करणे आणि डोनरकार्ड मिळविण्याचा अर्थ असा नाही की आपण कायद्याचा चौकटीत आला आहात. ही निव्वळ आपली इच्छा आहे. आपणास हे कार्ड कुठून मिळाले आहे याने काहीच फरक पडत नाही.

* हे कार्ड फक्त एक प्रतीक आहे की आपण अवयवदान करण्यास इच्छुक आहात. म्हणून हे आपल्या जवळ बाळगा आणि आपली अवयव दान करण्याची इच्छा आपल्या मित्रांना आणि कुटुंबीयांना सांगा.