1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कसे कराल
Written By
Last Modified: मंगळवार, 15 मार्च 2022 (17:07 IST)

व्हॉट्सअॅपने आणला 'डार्क मोड', बॅटरी वाचणार, डोळ्यांना देणार आराम अशा प्रकारे सेटिंग करा

व्हॉट्सअॅप हे अतिशय लोकप्रिय सोशल मेसेंजिंग अँप आहे. या अँप वरून आपण आपल्या मित्रांशी आणि दूरवर असलेल्या नातेवाईकांशी गप्पा करू शकता.त्यांना व्हॉइस कॉल आणि व्हिडीओ कॉल करू शकता. या मेसेंजर अँप मध्ये इतर वैशिष्टये देखील मिळतात. सध्या व्हाट्सअँप ने एक नवीन फीचर्स आणले आहे. ज्याचा वापर करून आपण रात्री देखील मोबाईल वरून चॅटिंग करू शकता. हे आहे डार्क मोड. या मध्ये आपण व्हाट्सअँपची थीम बदलू शकता. या मुळे मोबाईलची ब्राईटनेस कमी वापरली जाते.  
 
Whatsapp मध्ये डार्क मोड कसा सक्षम करायचा:
1 सर्वप्रथम, व्हॉट्स अॅप उघडा आणि नंतर अॅपच्या सेटिंग्ज मेनूमधील चॅट पर्यायावर जा.
2 चॅट मेनूमध्ये तुम्हाला डिस्प्ले लिहिलेला दिसेल, या मध्ये  थीमचा पर्याय दिसेल.
3  थीम पर्यायावर क्लिक करावे लागेल. 
4 थीम पर्यायावर क्लिक केल्यानंतर, आपल्या समोर  सिस्टम डिफॉल्ट, लाईट आणि डार्क  असे तीन पर्याय दिसतील.
 
डार्क थीम पर्याय निवडल्यानंतर, व्हॉट्सअॅपचे बेकग्राउंड डार्क थीम मध्ये  दिसेल. डार्क  थीम लागू केल्यानंतर, यामुळे प्रकाशाचे प्रमाण कमी होते, ज्यामुळे डोळ्यांवर ताण पडत नाही, तसेच स्मार्टफोनची बॅटरी वाचते.
 
व्हाट्सअँप मध्ये डार्क थीम लागू केल्यानंतर, ती अॅपच्या सेटिंग्ज, चॅट विंडो इत्यादी सर्व विभागांमध्ये दिसेल. याचा अर्थ व्हॉट्सअॅपची पार्श्वभूमी गडद राखाडी रंगाच्या थीममध्ये बदलेल.