1. मराठी बातम्या
  2. विधानसभा निवडणूक 2022
  3. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक 2022
Written By
Last Updated : मंगळवार, 11 ऑक्टोबर 2022 (16:49 IST)

या तारखेला उत्तर प्रदेशचे नवे मुख्यमंत्री म्हणून योगी आदित्यनाथ घेऊ शकतात शपथ, मंत्रिमंडळात असू शकतात 57 मंत्री

यूपीमधील बंपर विजयानंतर दिल्ली दौऱ्यावर असलेल्या योगी आदित्यनाथ यांनी रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 20 किंवा 21 मार्च रोजी योगी आदित्यनाथ उत्तर प्रदेशचे पुढील मुख्यमंत्री म्हणून शपथ घेऊ शकतात. योगींच्या नवीन मंत्रिमंडळात सुमारे 57 मंत्री शपथ घेतील अशी शक्यता आहे. त्यापैकी 22 ते 24 कॅबिनेट मंत्री असतील तर 7 ते 9 मंत्र्यांकडे स्वतंत्र प्रभार असू शकतो.
 
योगी आदित्यनाथ यांनी पंतप्रधान मोदींना शपथविधीसाठी आमंत्रित केले आहे. दरम्यान पीएम मोदी आणि योगी आदित्यनाथ यांच्यात सुमारे अडीच तास चर्चा झाली.
 
भेटीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून सांगितले की आज योगी आदित्यनाथ यांची भेट घेतली. यूपी निवडणुकीतील ऐतिहासिक विजयाबद्दल त्यांचे अभिनंदन. गेल्या 5 वर्षात त्यांनी जनतेच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी अथक परिश्रम घेतले आणि आता येत्या काही वर्षांत ते राज्याला विकासाच्या आणखी उंचीवर नेतील, अशी मला खात्री आहे.