1. लाईफस्टाईल
  2. योग
  3. योग सल्ला
Written By
Last Modified: गुरूवार, 16 नोव्हेंबर 2023 (10:05 IST)

Take a deep breath दीर्घ श्वास घ्या आजाराला पळवा

Take a deep breath आजच्या व्यस्त आणि धकाधकीच्या जीवनशैली मुळे लोकांना वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या उद्भवू लागतात. या साठी योगा मध्ये अनेक आसन आणि योग असे आहेत ज्यामुळे अनेक आजार दूर करता येतात. या पैकी आहे दीर्घ श्वसन. बऱ्याच आजारांना दीर्घ श्वास घेतल्यानेच दूर करू शकतो. परंतु आजच्या धावपळीच्या व्यस्ततम काळात लोकांना दीर्घ श्वास घेण्यासाठी पुरेसा वेळ देखील नाही. जर आपण आपल्या व्यस्ततम दिनचर्ये मधून थोडा वेळ काढून दीर्घ श्वासाचा सराव केला तर या मुळे झोप देखील चांगली येते. परंतु दीर्घ श्वास घेण्यासह हे देखील माहीत असावे की हे करण्याची योग्य पद्धत काय आहे. चला तर मग जाणून घेऊ या हे कसे करावं . 
 
* दीर्घ श्वासाची पद्धत - 
आरामात झोपून किंवा बसून हळू हळू नाकाने श्वास घेत आपल्या पोटात हवा भरून घ्या. नंतर हळू-हळू नाकाने श्वास सोडा. ही प्रक्रिया करताना आपला एक हात पोटावर आणि दुसरा हात छातीवर ठेवा.हळू-हळू श्वास घेताना पोटात हवा भरण्याची क्रिया अनुभवा. तसेच श्वास सोडताना पोट आत जाणे अनुभवा.
 
* हे लक्षात ठेवा- 
दीर्घ श्वास घेताना डोळे मिटून घ्या. सुरुवातीला घाईने नाही तर हळू-हळू दीर्घ श्वास घ्या. श्वास सोडण्याची आणि घेण्याची वेळ एकसारखी असावी. श्वास घेताना आणि सोडताना जास्त ताकद वापरू नका. हा व्यायाम करताना कपडे सैलसर असावे. सुमारे दहा ते वीस मिनिटांसाठी ही प्रक्रिया पुन्हा करा.  
 
* दीर्घ श्वास घेतल्याने तणाव कमी होतो-
लहान श्वासाचा संबंध तणाव आणि काळजीशी आहे. लहान श्वास घेतल्याने माणसाला काळजी, भीती,आणि वेगाने श्वास घेण्याचा त्रास होतो. तणाव आणि काळजीमुक्त होण्यासाठी आवश्यक आहे की आपण दीर्घ श्वास घ्यावा. या मुळे आपल्या शरीराला ऑक्सिजन पुरेशी मिळेल. आणि आपण काळजी आणि तणाव मुक्त व्हाल.  
 
* हृदयासाठी फायदेशीर -
दीर्घ श्वास घेतल्याने हृदयाची कार्य क्षमता वाढते आणि चरबी सहजपणे कमी होते.हृदय रोगाचा धोका टळतो. म्हणून  हृदय रोगाने ग्रस्त असणाऱ्यांनी नियमितपणे दीर्घ श्वासाचा सराव करावा.