सृजन फुलण्यासाठी...
|
* सूर्याचा संबंध सृजनाशी असतो. म्हणून जेव्हा सृजनात्मक काम करायचे असेल तेव्हा आपले तोंड सूर्याकडे वळवावे.
* घरात प्रत्येक ठिकठिकाणी चपला उलट्या पडलेल्या नसाव्यात. नाहीतर भांडणे होतात. त्यामुळे सृजनशीलतेवर दुष्प्रभाव पडतो.
* टेलिफोन किंवा मोबाईल जवळ पाण्याचा जग किंवा बाटली नसावी. कारण टेलिफोनच्या तारेमुळे येणारी इलेक्ट्रिक रेंज पाण्याला प्रदूषित करते.
* भाज्यांना नेहमी भांड्यातच चिरा. जमिनीवर ठेवल्याने त्यातील पोषक घटक संपून जातात. यामुळे शारीरिक व मानसिक क्षमतांवर परिणाम पडतो.
* घर किंवा ऑफिसमध्ये अडगळ सामान ठेवू नये. या वस्तू विपरीत परिणाम घडवतात. अशा व्यक्ती नकारात्मक विचाराच्या बनतात.
* डोक्याच्या संबंध सूर्याशी असतो, म्हणून विद्यार्थ्यांनी रोज सकाळी सूर्याला अर्घ्य अर्पण करावे.
* मुलांनी पूर्वेकडे तोंड करून वाचले तर त्यांच्या लक्षात रहाते.
* डोक्याची डावी बाजू सृजनशीलतेचे प्रतिनिधित्व करते. म्हणून असे आढळले आहे की डाव्या हाताने काम करणार्या लोकांची सृजनात्मकता उजव्या हाताने काम करणाऱ्या लोकांपेक्षा जास्त असते.
