फेंगशुई आणि पती-पत्नी
|
फेंगशुईनुसार दक्षिण-पश्चिम नैऋत्य दिशा, विवाह, प्रेम व आपसातील संबंधांची दिशा आहे. म्हणून सुखद दाम्पत्य जीवनासाठी बेडरूमला ऊर्जामय करण्यासाठी पौर्णिमेच्या रात्री लाल किंवा पिवळ्या मेणबत्त्या, दिवा किंवा लँप लावल्याने फेंगशुईच्या येंग ऊर्जेचा उदय होतो. ही उर्जा प्रेम व शांतीचे प्रतीक आहे.
पती-पत्नी यांना आपले प्रेम संबंध कायम राखण्यासाठी एका चौकोनी भांड्यात पाणी भरून त्यात दिव्याच्या आकाराच्या 4-5 लाल किंवा पिवळ्या मेणबत्त्या लावून त्या पाण्यात सोडाव्या. या भांड्यात कुठलेही 7 रत्न, लाकडाचा एक लहान तुकडा, गुलाब, झेंडू किंवा चमेलीचे फूल किंवा सोने व चांदीची अंगठी यात टाकावी.
|
शयनकक्षेत टी. व्ही. किंवा कॉम्प्युटर ठेवल्यानेसुद्धा दांपत्य जीवनात अरुची उत्पन्न होते. म्हणून खोलीत ह्या वस्तू ठेवण्यास टाळायला पाहिजे. जर या वस्तू ठेवणे फारच गरजेच्या असेल तर काम झाल्यावर त्यांना जाड कपड्यांनी झाकले पाहिजे.
|
शयन कक्षेत आरसा गरजेचा असेल तर तो पूर्व किंवा उत्तरमुखी असावा. या आरशामुळे घरात सुख शांती नांदते. खोलीत गोल आरसा लावला असेल तर पलंगाचे प्रतिबिंब त्या आरशात दिसायला नको. जर असे होत असेल तर झोपताना आरसा झाकून ठेवा. हे उपाय प्रत्यक्षात आणले तर नक्कीच लाभ होईल.
