फेंगशुईनुसार असावे दुकान!
ND
NDआपल्या जीवनात वास्तुमुळे येणार्या अडचणी व त्यावरील निदान याविषयी वास्तुशास्त्र व फेंगशुईमध्ये विस्तुत माहिती देण्यात आली आहे. आपले भाग्य आपल्या जन्मवेळेवर निर्धारित असते. फेंगशुईच्या माध्यमातून आपला निवास आणि व्यवसायाचे ठिकाण यांच्यात जर सुधारणा झाली तर आपले भाग्य आपोआप बदलत असते. चीन, जपान, हॉंगकॉंग आदी दक्षिण-पूर्वी आशियामधील देशातील व्यापार- व्यवसायातील प्रगतीमागे फेंगशुईचे असलेले पाठबळ नाकारता येणार नाही.
व्यापारातील भरभराटीसाठी फेंगशुईचे सिध्दांत-
1. दुकानाचा दरवाजा मोठा असावा. तसेच तो मुख्य रस्त्याकडून उघडणारा असवा. दरवाजा अरूंद गल्लीकडून उघडू नये.
2. दुकानाच्या दरवाज्यासमोर स्तंभ, विजेचा खांब, वृक्ष, खंडर, जिना, घराचे किंवा दुकानाचा टोकदार भाग नसावा.
3. आपले दुकान जर रस्त्याच्या त्रिफुलीवर असेल तर दुकानाच्या बाहेर एक आरसा अवश्य लावावा.
4. दुकानाचे कॅश काऊंटर दरवाज्याला खेटून अथवा समांतर ठेऊ नये.
5. दुकानाच्या आतील भिंतींना रंग फेंगशुईनुसार असावा.
