मुलांची खोली कशी असावी?
ND
NDमुलांच्या खोलीचे प्रवेशद्वार उत्तर अथवा पूर्व दिशेला पाहिजे. तसेच खोलीच्या खिडक्या ह्या पूर्व दिशेला असाव्यात. त्यांच्या अभ्यासाचा टेबल हा पूर्व अथवा उत्तर दिशेला असावा. पुस्तके ईशान्य कोपर्यात ठेवावीत. अभ्यास करताना मुलांचा चेहरा उत्तर अथवा पूर्व दिशेला असावा, अशी त्यांची अभ्यासाची व्यवस्था केली पाहिजे. एक छोटेशे मंदीर मुलांच्या खोलीत असावे. त्या मंदीरात विद्देची अधिष्ठात्री देवी सरस्वतीची मूर्ति अथवा प्रतिमा असावी.
मुलांच्या खोलीत अभ्यास साहित्याशिवाय इतर सामानाची गर्दी करू नये. मुलाचा बिछाना हा नैऋत्य कोपर्यात असावा. झोपतांना त्यांचे डोके दक्षिण दिशेला पाहिजे. परंतु मुलांनी स्वत:चे डोके पूर्व दिशेलाही ठेवू शकतात.
मुलांच्या खोलीतील भिंतींना भडक रंग देऊन नये. हलक्या रंगाच्या शेड्स द्याव्यात. त्यामुळे मुलांचा स्वभाव शांत राहून त्यांची स्मरणशक्ती वाढण्यास मदत होईल. खोलीतील मध्यभाग हा मुलांना खेळण्यासाठी मोकळा सोडावा. मुलांच्या खोलीचा दरवाजा जिन्याला खेटून अथवा शौचालयास खेटून नसावा. मुलांची खोली नेहमी स्वच्छ असावी.
