धुळे: ऊसतोड मजुरांची गाडी बोरी नदीत कोसळली, 7 ठार

dhule
Last Modified शनिवार, 30 नोव्हेंबर 2019 (12:43 IST)
धुळे जिल्ह्यातील विंचूर इथल्या नदीत गाडी कोसळून 7 जणांचा मृत्यू झाला तर 20 जण गंभीर जखमी झाले. शुक्रवारी-शनिवारच्या मध्यरात्री ही घटना घडली.
मध्य प्रदेशच्या सेंधवा इथून मजुरांची एक गाडी ऊसतोडीसाठी उस्मानाबादला येत होते. तेव्हा धुळे जिल्ह्यातल्या शिरूर गावाजवळील विंचूर फाट्यावर ही गाडी पोहोचली आणि तितक्यात बोरी नदीच्या पुलावर वाहनचालकाचं गाडीवरचं नियंत्रण गेल्याने हा अपघात झाला.

पुलावरून खाली कोसळल्यानं गाडी चक्काचूर झाली आणि त्यातील 7 जणांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये 1 पुरुष, 1 महिला आणि 5 बालकांचा समावेश आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, "मध्यप्रदेशमधील बडवानी जिल्ह्यातील सेंधवा तालुक्यातील धवल्यागिर गावातील 24 मजूर आपल्या मुलांसह M.H. 25 P 3770 क्रमांकाच्या गाडीमध्ये उस्मानाबादला ऊसतोडीसाठी चालले होते.
धुळे जिल्ह्यातील शिरूड चौफुलीपुढील विंचूर शिवारातील बोरी नदीवरील ब्रिटिशकालीन पुलावर वाहन चालकाचं नियंत्रण सुटल्यानं गाडी नदीपात्रात पडली आणि त्यात 7 जणांचा मृत्यू झाला."
हा अपघात मध्यरात्री झाल्यानं रात्री उशिरापर्यंत बचत बचावकार्य सुरू होतं. किरकोळ आणि गंभीर जखमींना तात्काळ धुळे शहरातील हिरे वैद्यकीय महाविद्यालय येथे उपचारारसाठी दाखल करण्यात आलं आहे.

यावर अधिक वाचा :

अयोध्या प्रकरणात पुनर्विचार याचिकेमुळे काय बदल होईल?

अयोध्या प्रकरणात पुनर्विचार याचिकेमुळे काय बदल होईल?
अयोध्येच्या वादग्रस्त जमिनीच्या वादावर सुप्रीम कोर्टाच्या खंडपीठाने 9 नोव्हेंबरला ...

प्रसिद्ध गायिका गीता माळी यांचा अपघात सीसीटीव्हीत कैद, ...

प्रसिद्ध गायिका गीता माळी यांचा अपघात सीसीटीव्हीत कैद, व्हिडियो प्रचंड व्हायरल
प्रसिद्ध गायिका आणि नाशिकच्या रहिवासी गीता माळी या प्रवास करत असलेली कार गॅस टँकरला ...

Tik-Tok पुन्हा अडचणीत, मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका ...

Tik-Tok पुन्हा अडचणीत, मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल
पूर्वी एकदा कोर्टाने बंदी घातलेल्या Tik-Tok विरोधात आता पुन्हा एकदा मुंबई उच्च न्यायालयात ...

राजधानी मुंबईच्या मनपाच्या महापौर किशोरी पेडणेकर

राजधानी मुंबईच्या मनपाच्या महापौर किशोरी पेडणेकर
मुंबईच्या महापौरपदासाठी शिवसेनेकडून किशोरी पेडणेकर यांचे नाव निश्चित झाले आहे. ...

काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्याशी सरकार स्थापनेबाबत ...

काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्याशी सरकार स्थापनेबाबत चर्चा झाली नाही
महाराष्ट्रात सरकार स्थापनेबाबतचा पेच अद्याप कायम असून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद ...