1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शनिवार, 4 फेब्रुवारी 2023 (12:25 IST)

शिव ठाकरे बिग बॉसमधून बाहेर?

Bigg Boss 16 Winner
आता बिग बॉस 16 ग्रँड फिनालेला फक्त एक आठवडा बाकी आहे. सध्या बिग बॉस 16 च्या घरात प्रियांका चहर चौधरी, एमसी स्टेन, अर्चना गौतम, निमृत कौर अहलुवालिया, शिव ठाकरे आणि शालीन भानोट उपस्थित आहेत. आता शो अंतिम टप्प्याकडे जात असताना, माजी बिग बॉस स्पर्धक आणि सेलिब्रिटी सांगत आहेत की त्यांच्या मते विजेता कोण होणार आहे? या सीझनची ट्रॉफी कोण जिंकणार आहे हेही डॉली बिंद्राने सांगितले.
 
दरम्यान, शोच्या फिनालेपूर्वी शिव ठाकरे घराबाहेर पडणारा अशी शक्यता वर्तवली जात आहे. तसेच काही दिवसांपुर्वी करण जोहरने शिवला एलिमिनेट करण्याचा इशारा ही दिला होता. आजच्या शोमध्ये करण जोहर सुंबूल तौकीर खानलाही तिच्या वागणुकीमुळे सोबतच शिव ठाकरे आणि एमसी स्टॅनला नॉमिनेट का करण्यात आले याचे कारण स्पष्ट करायला सांगणार आहे.
 
कोण होणार बिग बॉस 16 चा विजेता?
बिग बॉस 16 सुरू झाल्यापासून घरात एक वर्तुळ तयार झाले आहे. या मंडळात शिव, स्टेन आणि निमृत यांचा समावेश आहे. सुंबल, साजिद खान आणि अब्दू रोजिक यांनी याआधीच शोमधून बाहेर पडले आहे. ई-टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत, बिग बॉस 4 मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्रीने गोंधळ निर्माण करणाऱ्या डॉली बिंद्राने बिग बॉस 16 चा विजेता कोण होणार हे सांगितले आहे.
 
डॉली बिंद्रा म्हणाली, 'निम्रित कौर अहलुवालिया पूर्णपणे जिंकत आहे.' डॉली म्हणते की, ज्या क्षणी तिने निमृतला पाहिले तेव्हाच तिला माहित होते की छोटी सरदारनीची अभिनेत्री जिंकणार आहे. जेव्हा तिला दुसरा अंदाज घेण्यास सांगितले गेले तेव्हा डॉलीने अंकित गुप्ताचे नाव घेतले की तो शोमध्ये राहिला असता तर ट्रॉफी जिंकली असती.