माळव्यातला श्रेष्ठ श्री सर्वोत्तम दिवाळी अंक

sarvottam
Last Updated: सोमवार, 18 नोव्हेंबर 2019 (16:41 IST)
महाराष्ट्रात दिवाळी विषेशांकांची परंपरा आता शंभर वर्षांपेक्षा देखिल फार जुनी आहे. पण बृहनमहाराष्ट्रात बोटांवर मोजण्या इतपतच चारपांच दिवाळी विशेषांक प्रकाशित होतात. यात माळव्यातून (इंदूर, मध्यप्रदेश) गेल्या पंधरा वर्षांपासून प्रकाशित होत असलेला आपली श्रेष्ठता टिकवून असतो. फार श्रेष्ठ दर्जाचा कागद, उत्तम छपाई, उत्तम बांधणी आणि यात श्रेष्ठ दर्जेदार साहित्य म्हणजे ‘ सोने पे सुहागा.’
श्री सर्वोत्तमच्या दिवाळी अंकांना महाराष्ट्रात अनेक पुरस्कार प्राप्त झालेले आहे .

२०१९ चा श्री सर्वोत्तमचा दिवाळी अंक देखिल आपल्या प्रतिष्ठे प्रमाणे साजेसा आहे. दर वर्षी एक नवा विषय देऊन लेखकांना त्या विषयावर लिहिते करणे आणि त्यांना प्रोत्साहित करण्याचे धोरण एकूण साहित्यात दिसून येते . मागच्या (२०१८ ) वर्षीचा विषय होता ‘पृथ्वीतत्व‘ तर या वर्षीच्या दिवाळी अंकासाठीचा विषय होता ‘आकाश तत्व.‘आकाशतत्व या विषयाच्या लेखात अनेक रोचक, ज्ञानवर्धक आणि माहितीसाठी प्रकाशित लेखांमधे, डॉ.प्रदीप तराणेकर यांचा ‘वेद पुराण कालीन विमानयंत्र‘, केप्टन डॉ. आनंद जयराम बोडस यांचा लेख ‘आकाश तत्वांची हवाई जाणीव‘, डॉ.मोहन बांडे यांचा लेख ‘तुका आकाशा एवढा‘, प्रसिद्द संगीतकार कौशल इनामदार यांचा लेख ‘खिड़की एवढे आभाळ‘, वसंत साठे यांचा लेख ‘इसरोचे निर्धारित लक्ष चंद्रयान-२‘, कर्नल सारंग थत्ते (सेवानिवृत) यांचा लेख ’उंच आकाश घे भरारी‘, रुतराज.वि.पत्की यांचा लेख ‘ऑस्टेराईडस आंगतुक पाहुणे‘, संतोष.डी.पाटील यांचा लेख ‘अनमोल स्वयं प्रकाश तारे‘, तर स्नेहा वाघ यांचा लेख ‘मायेचं आभाळ‘
आणि मेघना साने यांचा लेख ‘पहाट अनुभवताना’ असे सार्थक लेख आहेत.

आकाशतत्व या विषयाशिवाय या ‘श्री सर्वोत्तम‘ च्या दिवाळी अंकात इतरही बरचं काही आहे. प्रवासवर्णनात हरी मुस्तीकर यांचा लेख ‘नार्दन लाईट निसर्गाचा चमत्कार‘, हेमलता वैद्य यांचा लेख ‘सुन्दर भूतान‘ आणि माणिक भिसे यांचा लेख ‘डेन्यूब चे लेकरु‘ हा आहे.


प्रसिद्द रंगकर्मी बाबा डिके यांच्या जन्मशताब्दी वर्षात त्यांच्या स्मृतींना स्मरण करत अरुण डिके यांचा लेख ‘बाबा डिके-जन्म शताब्दी वर्ष‘ आणि प्रसिद्ध रंगकर्मी श्रीराम जोग यांचा लेख ‘बाबा‘ हे वाचनीय आहेत. या शिवाय सुप्रसिद्ध लावणी नृत्यांगना श्रीमती लीला गांधीची ओळख करविणारा जयश्री तराणेकर यांचा लेख आहे. डॉ. प्रदीप शंकर तराणेकर यांनी ‘तारांगण‘ या सदरात १२ राषिंच्या १२ महिन्यांच्या भविष्यावर आढावा घेतला आहे. एकूण ५० पेक्षा जास्त नामवंत कवीं आणि गजलकारंच्या कविता आणि गजलने सजलेल्या या दिवाळी अंकात सुप्रसिद्ध लेखिका पद्मश्री मालती जोशीं सकट एकूण १७ दर्जेदार कथा वाचकांना बांधून ठेवतात. श्री सर्वोत्तमचा हा अंक नक्कीच वाचनीय आहे.
-विश्वनाथ शिरढोणकर


यावर अधिक वाचा :

पंढरपुरात विठू-रखुमाईची शासकीय महापूजा पहाटे उत्साहात

पंढरपुरात विठू-रखुमाईची शासकीय महापूजा पहाटे उत्साहात संपन्न
कार्तिकी एकादशीला पंढरपुरात श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात विठू-रखुमाईची शासकीय महापूजा ...

शैक्षणिक प्रवेश प्रक्रियेला हिरवा कंदिल, राज्य सरकार वादात ...

शैक्षणिक प्रवेश प्रक्रियेला हिरवा कंदिल, राज्य सरकार वादात सापडण्याची चिन्हे
मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या हंगामी स्थगितीनंतर ठप्प झालेली २०२०-२१ या ...

दिग्गज फुटबॉलर डिएगो मॅराडोना यांचे वयाच्या 60 व्या वर्षी ...

दिग्गज फुटबॉलर डिएगो मॅराडोना यांचे वयाच्या 60 व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले
अर्जेंटिनाचा महान फुटबॉलर आणि प्रशिक्षक डिएगो मॅराडोना यांचे वयाच्या 60 व्या वर्षी निधन ...

चमोलीच्या नीती खोर्‍यात पहिल्यांदा वाजतील मोबाइल, JIOने ...

चमोलीच्या नीती खोर्‍यात पहिल्यांदा वाजतील मोबाइल, JIOने प्रथमच दोन 4 जी टॉवर्स सुरू केले
उत्तराखंडच्या चमोलीतील भारत-तिबेट सीमेला लागणारी नीती खोर्‍यात रिलायन्स जिओचे दोन 4 जी ...

आई हेच आपले खरे दैवत

आई हेच आपले खरे दैवत
प्रत्येकाच्या आयुष्यात महत्त्वाची भूमिका कोणी बजावत तर ती आपली आई असते. खरं तर आई हा शब्द ...

महत्त्व नखांच्या स्वच्छतेचं

महत्त्व नखांच्या स्वच्छतेचं
शरीराच्या स्वच्छतेकडे प्रत्येकजण कमी अधिक प्रमाणात काहोईना लक्ष देत असतो. पण नखांच्या ...

हनुमानाकडून Management शिका, नेहमी यश हाती लागेल

हनुमानाकडून Management शिका, नेहमी यश हाती लागेल
अंजनीपुत्र हनुमान एक कुशल व्यवस्थापक होते. मनावर, कृतीवर आणि वाणीवर संतुलन कसे ठेवायचं हे ...

मेथीची भाजी बऱ्याच काळ ताजी ठेवण्यासाठी गजब टिप्स

मेथीची भाजी बऱ्याच काळ ताजी ठेवण्यासाठी गजब टिप्स
हिवाळ्याच्या हंगामात बऱ्याच भाज्या बाजारपेठेत दिसू लागतात. या मध्ये हिरव्या पाले ...

Immune System मजबूत करतं तुळशीचा चहा

Immune System मजबूत करतं तुळशीचा चहा
सर्वप्रथम 2 कप पाणी एका पातेलीत घालून उकळण्यासाठी ठेवा. पाणी उकळल्यावर पातळी गॅस वरून ...

Canara Bank SO Recruitment 2020 विशेषज्ञ अधिकारी पदांसाठी ...

Canara Bank SO Recruitment 2020 विशेषज्ञ अधिकारी पदांसाठी भरती सुरू
कॅनरा बँकेने विशेषज्ञ अधिकाऱ्यांच्या पदासाठी रिक्त जागा काढली आहेत. पदवीधरांना बँकेत ...