श्रेयस तळपदे चित्रपट निर्मितीत
|
कांदे पोहे हा चित्रपट काही खाद्यपदार्थावर आधारीत नाही. तो एक चांगला मनोरंजक असा चित्रपट असेल असे श्रेयसने सांगितले. मुक्ता आर्टसच्या सहकार्याने बनविण्यात येणारा हा चित्रपट युवक वर्ग डोळ्यासमोर ठेवून तयार करण्यात येणार असल्याचे श्रेयस म्हणाला.
|
खरे तर एवढ्या लवकर मी निर्माता बनावे काय याविषयी माझ्या मनातच गोंधळ होता, पण सुभाषजींनी मला समजावले. त्यांच्या पाठिंब्याने आणि विश्वासानेच मला ही उडी घेण्याची ताकद मिळाली, श्रेयस हसत हसत सांगतो.
निर्माता श्रेयसच्या चित्रपटात अभिनेता श्रेयस मात्र दिसणार नाहीये. याचे चित्रीकरण सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. कारण तोपर्यंतच्या तारखा त्याने श्याम बेनेगल यांच्या चित्रपटासाठी दिल्या आहेत. एकाच वेळी दोन कामे करणे मला शक्य नाही, असे तो सांगतो.
श्रेयसच्या मते मराठी चित्रपटात मोठे होण्याच्या खूप संधी आहेत. तो म्हणतो, आमच्याकडे गुणवत्ता आहे. चांगले अभिनेते, अभिनेत्री आहेत. पण मार्केटमध्ये चांगला पाठिंबा आणि सर्व ठिकाणी वितरण करण्यात आम्ही कमी पडतो. पण मुक्ता आर्टससारख्या मोठ्या बॅनरच्या सहाय्याने मराठी चित्रपटसृष्टीची ध्वजा उंचावण्यास मदत होईल.
|
''कांदेपोहे'' या चित्रपटाचे दिग्दर्शन राजीव पाटील करणार आहेत. संजय पवार यांनी पटकथा-संवादलेखन केले असून, तुषार दळवी, सुबोध भावे, शिल्पा तुळसकर आदी कलाकार यात काम करीत आहेत. चार गाणी या चित्रपटात आहेत. त्याचे चित्रीकरण मुंबई व पुणे येथे होणार आहे.
